
Liver Health Alert
sakal
Liver Care Tips: कावीळसारखा विषाणूजन्य संसर्ग, दीर्घकाळाचे मद्यपान, चुकीचा आहार, स्थूलता व बदललेल्या जीवनशैलीमुळे यकृत निकामी होण्याचे प्रमाण वाढत आहे. यकृत (लिव्हर) निकामी झाल्यावर त्याचे प्रत्यारोपण करणे हा पर्याय उरतो. पुणे विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीच्या आकडेवारीनुसार, पुणे विभागात ८०० जण यकृताच्या प्रतीक्षेत आहेत. यकृत निकामी होऊ नये, यासाठी काळजी घेणे आवश्यक असल्याचे मत यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ व्यक्त करतात.