liver care
sakal
- डॉ. मालविका तांबे
आधुनिक जीवनशैली आज बऱ्याच रोगांना कारणीभूत ठरत आहे. त्यातील नकळत होणाऱ्या त्रासांमध्ये फॅटी लिव्हर ही ससस्या आज बऱ्याच लोकांना भेडसावत आहे. बऱ्याचदा लोकांना असे वाटते मी कुठलेही दारुसारखे व्यसन करत नाही. मग मला हा त्रास का झाला? पण आपल्या हे लक्षात येत नाही की आधुनिक जीवनशैली शरीरावर दारूसारखा वाईट परिणाम आणत असावी.