Corona ला भिऊ नका फक्त इम्युनिटीवर फोकस करा! 'या' खास पेयाने विषाणू पळेल दूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Lemongrass tea

Corona ला भिऊ नका फक्त इम्युनिटीवर फोकस करा! 'या' खास पेयाने विषाणू पळेल दूर

Lemongrass Herbal Tea For Strong Immunity: चीनमध्ये परत एकदा कोरोनाने थैमान घातले आहे. भारतातही कोरोनाचे रूग्ण सापडल्याने आता लोकांच्या मनात आरोग्याविषयक चिंता निर्माण झाली आहे. मात्र कोरोनाच्या प्रभाव तुमच्यावरही होईल अशी भिती बाळगण्याऐवजी तुमची इम्युनिटी कशी वाढवता येईल यावर फोकस करायला हवं. असे केल्यास तुम्ही कोरोनाच्या कठीण काळातही स्वत:ला निरोगी ठेवू शकाल.

तसेच तुम्ही अजून कोरोना व्हॅक्सिनचे डोज पूर्ण केले नसतील तर ते लगेच करावे.

स्ट्राँग इम्युनिटीसाठी प्या ही टी

स्ट्राँग इम्युनिटीसाठी लेमनग्रास हर्बल टी प्या. लेमनग्रास हे हिरव रोपटं आहे. याचा उपयोग साउथ ईस्ट भागात जेवणात केला जातो. तेव्हा तुम्ही हर्बल टी बनवून पित असाल तर तुमची इम्युनिटी बूस्ट होईल. तुमची पचनशक्तीही सुधारेल. तसेच या टी ने तुमचं वजनही नियंत्रणात राहील. (Immunity Booster)

लेमनग्रास हर्बल टी चे फायदे

  • लेमनग्रासमध्ये अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात.

  • ही हर्बल टी बॉडीला इजा पोहोचवणाऱ्या फ्री रॅडीकल्सला घालवण्यास मदत करते.

  • त्यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्तीही सुधारते.

  • व्हायरल इन्फेक्शनपासून तुमचा बचाव करते.

  • शरीरातील टॉक्झिक पदार्थही बाहेर काढते.

लेमनग्रास हर्बल टी कशी बनवायची?

  • लेमनग्रास टी बनवण्यासाठी लिंबू, मध, लवंग आणि आलं रेडी ठेवा.

  • एका भांड्यात पाणी घ्या आणि त्याला उकळी येऊ द्या.

  • उकळी आल्यानंतर त्यात हे सगळे पदार्थ टाका आणि सोबत लेमन ग्रासही टाका.

  • उकळी आल्यानंतर पाणी गाळून घ्या.

  • ही टी पिताना एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेवा. लेमनग्रास हर्बल टी दिवसातून दोन पेक्षा जास्त वेळा पिऊ नका.