
Protein Powder Side Effects: अनेक लोक निरोगी राहण्यासाठी प्रोटीन पावडरचे सेवन करतात. तर अनेक लोक वजन वाढवण्यासाठी तर काही वजन कमी करण्यासाठी प्रोटीन पावडर घेतात. परंतु काहीवेळा सामान्य आहारातून शरीराच्या आवश्यकतेनुसार प्रथिने मिळणे कठीण होते, कारण सामान्य आहाराबरोबरच आपल्याला प्रथिने तसेच कार्ब्स आणि फॅट इत्यादी मिळतात. त्यामुळे शरीरात जास्त कॅलरीज जाऊ लागतात.
अशावेळी प्रोटीन पावडर हाच पर्याय ठरतो. विविध ब्रँड्सचे प्रोटीन पावडर बाजारात विक्रिस आहेत. यामुळेच अनेक वेळा चुकीची प्रोटीन पावडर नकळत घेतली जाते, ज्यामुळे नंतर यकृत आणि किडनीचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. तुम्हीही प्रोटीन पावडर घेत असाल तर तुम्हीही काळजी घ्यावी.