जुन्या भीतीचे मेंदूवर खोलवर ठसे; मानसिक आघाताचा थेट मेंदूतील पेशींवर परिणाम! PTSD संशोधनातील धक्कादायक निष्कर्ष...

भयावह घटना आणि मानसिक धक्के बसल्यानंतर 'पोस्ट ट्रॉमेटिक स्ट्रेस डिसऑर्डर'चा (PTSD) मेंदूवर कसा परिणाम होतो, याबाबत 'सेल रिपोर्ट्स'मध्ये सविस्तर माहिती प्रसिद्ध झाली आहे....
PTSD vs Major Depression How Trauma Leaves Different Molecular Marks in the Brain

PTSD vs Major Depression: How Trauma Leaves Different Molecular Marks in the Brain

esakal 

Updated on: 

Mental Health: पोस्ट ट्रॉमेटिक स्ट्रेस डिसऑर्डर (PTSD) हा केवळ मानसिक ताणापुरता मर्यादित नसून, तो मेंदूमध्ये विशिष्ट आण्विक, पेशींशी संबंधित आणि रचनेतील बदल घडवून आणतो, असे नव्या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. या संशोधनात PTSD मुळे मेंदूच्या वेगवेगळ्या भागांत होणाऱ्या बदलांची सखोल तपासणी करण्यात आली आहे.

एखाद्या भयावह किंवा जीवघेण्या प्रसंगाचा सामना केल्यानंतर संबंधित व्यक्तीला त्या घटनेचे फ्लॅशबॅक येणे किंवा वाईट स्वप्ने पडणे अशी लक्षणे PTSD मध्ये दिसतात. ताण आणि मानसिक आघात मेंदूमध्ये आण्विक पातळीवर खुणा मागे ठेवू शकतात, ज्यामुळे या विकाराची कार्यपद्धती समजून घेण्यास मदत होते.

Loading content, please wait...