

Pune Faces Growing Lifestyle Disease Burden as Hypertension and Diabetes Numbers Climb
sakal
Health News in Marathi: बैठे काम, खानपानाच्या बदललेल्या सवयी, उशिरापर्यंतचे जागरण अन् शारीरिक हालचालींचा अभाव या एकंदरीत बदललेल्या आधुनिक जीवनशैलीचे परिणाम आता दिसत आहेत. यामुळे, उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग आणि हृदयविकार अशा असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण शहरातील तरुणांमध्ये झपाट्याने वाढत आहे. महापालिकेच्या दवाखान्यांतील आकडेवारीनुसार वर्षभरात ७५ हजार उच्च रक्तदाब, तर ४४ हजार जणांना मधुमेहाचे निदान झाले आहे. इतर आजारांच्या तुलनेत ही रुग्णसंख्या अनेक पटींनी जास्त आहे.