Harbhara Leaves Bhaji
esakal
Rabi Season Chickpea Crop : यावर्षी सर्वत्र समाधानकारक पाऊस झाल्याने जलस्रोतांमध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे रब्बी हंगामाची मोठ्या प्रमाणावर पेरणी झाली असून, यामध्ये हरभरा पिकाची लागवड सर्वाधिक आहे. कडाक्याच्या थंडीमुळे हरभऱ्याचे पीक उत्तम वाढत आहे. भाजीसाठी वापरली जाणारी हरभऱ्याची कोवळी पाने बाजारात विक्रीसाठी येत असून, तज्ञ्जांच्या मते थंडीत हरभऱ्याची भाजी आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते.