

Rabies Treatment Delay Can Be Fatal | Know Everything about the Disease
sakal
Rabies Can Be Fatal If Treatment Is Delayed: सध्या सोशल मीडियावर सातारा जिल्ह्यातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात एक व्यक्ती विचित्रपणे वागताना दिसत आहे. अनेकांनी त्याला रेबीज झालेला कुत्रा चावल्यामुळे असा वागत असल्यासारख सांगितलं आहे पण नुकत्याचं मिळालेल्या माहितीनुसार तो व्यक्ती एक मनोरुग्ण असल्याचं समोर आलं आहे.
पण केव्हाही कुत्रा चावला आणि एखाद्याला रेबीज झाला आहे हे ओळखण्यासाठी रेबीज बद्दल संपूर्ण माहिती असणं गरजेचं आहे. कारण रेबीज हा असा जीवघेणा ठरणारा आजार आहे ज्याच्या उपचारामध्ये थोडासुद्धा उशीर झाला, तर त्याचे परिणाम अत्यंत गंभीर होऊ शकतात.