Health: सतत बाहेरचं चविष्ट खाताय? परिणाम गंभीर होऊ शकतात, राजू श्रीवास्तव यांनाही... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Health Tips

Health: सतत बाहेरचं चविष्ट खाताय? परिणाम गंभीर होऊ शकतात, राजू श्रीवास्तव यांनाही...

Health Tips: हल्ली लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचा कल हा फास्ट फूड खाण्याकडे दिसून येतो. मात्र फास्ट फुड खाताना जरी चविष्ट वाटत असलं तरी त्याचे होणारे गंभीर परिणाम तुम्हाला माहिती आहे काय? साधारणत: मानवी शरीराचे ठोके एक मिनिटाला ६०,९० किंवा १०० वेळा पडतात. मात्र हृदयविकारादरम्यान हे ठोके वाढून २५० ते ३५० एवढे जातात.

कार्डियाक अरेस्ट ही फार गंभीर स्थिती आहे. यामध्ये हृदय बंद पडून काही मिनिटातच माणसाचा मृत्यू होऊ शकतो. या आजाराची लक्षणे काही लोकांमध्ये दिसतात तर काही लोकांमध्ये अजिबात दिसत नाहीत. मात्र एखाद्याच्या हृदयात फार दुखत असेल आणि त्याला फिरकी येत असेल तर हे कार्डियाक अरेस्टचे लक्षण असू शकतात.

या चुंकांमुळे होऊ शकतो हृदयविकार

आतापर्यंत जगभऱ्यात झालेल्या रिसर्चनुसार, हृदयाशी संबंधित सगळ्या आजारांचं मुख्य कारण तुमची जीवनशैली आणि तुमच्या खाण्यापिण्यातील वस्तूच असतात. तसेच शाकाहारी जेवण घेणाऱ्या लोकांच्या तुलनेत मांसाहारी लोकांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण जास्त असल्याचे आढळून आले आहे.

हेही वाचा: Recipe: Heart Attack ची भीती वाटतेय? कढीपत्ता चटणी खा आणि Relax व्हा!

फॅटयुक्त पदार्थ टाळा

तुम्हाला जर निरोगी राहायचं असेल तर आजच तुम्हाला काही गोष्टी खाणे टाळावे लागेल. फॅटयुक्त पदार्थ मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका वाढवतात. निरोगी आरोग्यासाठी आहारात कमीत कमी फॅटयुक्त पदार्थ असायला हवेत. पिज्जा, बर्गर, पास्ता, चिप्स, कुकीज आणि मैदायुक्त पदार्थांना तुमच्या आहारात प्राधान्य देऊ नका. यामुळे तुमच्या शरीरातील कोलेस्टेरॉल वाढून तुम्हाला हृदयाचे आजार होण्याचा धोका वाढतो.

हेही वाचा: प्रेमातंच नाही तर आजारतही होतो Heart Break! वाचा काय आहे ब्रोकन हार्ट सिंड्रोम

निकोटीनयुक्त ड्रिंक टाळा

निकोटीनमध्ये अॅक्टिव्ह केमिकल असतं. त्यामुळे ब्लड प्रेशर वाढू शकतं. सिगारेट, हुक्का आणि तंबाखू यांसारख्या पदार्थांचं सेवन आजच टाळा.

अतिगोड पदार्थ टाळा

अतिगोड पदार्थांमुळे तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. चॉकलेट, स्वीट ड्रिंग यांसारख्या गोड पदार्थांचा आरोग्यावर दुष्परिणाम होतो.

हेही वाचा: Health Tips : ५ प्रॉब्लेम्स, १ सोल्युशन; अनेक आजारांवर प्रभावी आहेत 'या' बिया

मीठाचं जास्त प्रमाण

मीठ हे आरोग्यासाठी महत्वाचंच आहे मात्र याची अधिक मात्रा तुमच्या आरोग्याला धोक्यास पात्र ठरू शकते. मीठाचं अतिप्रमाण हाय ब्लड प्रेशरचं कारण ठरू शकतं. संपूर्ण दिवसात एक चमचा मीठ पुरेसं आहे.

Web Title: Raju Srivastava Dies At 58 Age Avoid Worst Foods Diet Cause Cardiac Arrest Make Heart Weak See Impact

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..