Summer Health Care : उष्माघाताची लक्षणे वेळीच ओळखा अन् धोका टाळा..!

Summer Health Care : दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत असल्याने उष्णतेचा पाराही वाढत आहे. त्यामुळे उष्माघाताचा धोका निर्माण झाला आहे
Summer Health Care
Summer Health Careesakal

Summer Health Care : दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत असल्याने उष्णतेचा पाराही वाढत आहे. त्यामुळे उष्माघाताचा धोका निर्माण झाला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर कोल्हापूर महापालिकेने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच उष्माघाताच्या रुग्णांसाठी शहरातील सावित्रीबाई फुले रुग्णालयातील सहा बेड राखीव ठेवले आहेत.

राज्य सरकारने महापालिकेला अतिउष्णतेच्या लाटेमध्ये काय काळजी घ्यावी, याबाबतच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पत्र पाठविले आहे. त्यानुसार महापालिका प्रशासनाने नागरिकांनी काय काळजी घ्यावी? याबाबत आवाहन केले आहे. त्याचबरोबर महापालिकेने उपाययोजनाही केल्या आहेत. त्यानुसार सावित्रीबाई फुले रुग्णालयातील औषध विभाग, बालरोग विभाग, अतिदक्षता विभाग, महिला विभाग या ठिकाणी सहा बेड उष्माघाताच्या रुग्णांसाठी राखीव ठेवले आहेत.

महापालिकेचे आरोग्य अधिकारी, डॉ. प्रकाश पावरा म्हणाले, उन्हाचा पारा वाढत चालला आहे. त्यामुळे उष्माघाताचाही धोका निर्माण झाला आहे. या संदर्भात महापालिकेकडून उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तसेच नागरिकांना दक्षता घेण्याबाबत आवाहनही करण्यात आले आहे.

Summer Health Care
Health Care : द्राक्षे न धुता खाल्ल्यास आजारांचा वाढेल धोका

उष्माघात होण्याची कारणे

  • उन्हाळ्यात शेतावर किंवा इतर मजुरीची कामे फार वेळ करणे

  • कारखान्याच्या बॉयलर रूममध्ये काम करणे, काच कारखान्यात काम करणे

  • जास्त तापमानाच्या खोलीत काम करणे

  • घट्ट कपड्यांचा वापर करणे

उष्माघाताची लक्षणे

  • कातडी लालसर होणे, सूज येणे, वेदना, ताप आणि डोकेदुखी

  • हातापायात गोळे, पोटाच्या स्नायूमध्ये मुरडा, खूप घाम

  • थकवा, कातडी थंडगार, नाडीचे ठोके मंद, चक्कर, उलटी

हे करा-

  • पुरेसे पाणी प्या, प्रवासात पाणी सोबत ठेवा

  • उन्हात जाताना टोपीखाली ओलसर कपडा ठेवा

  • हलक्या वजनाचे, फिकट रंगाचे, सैलसर कपडे वापरणे, उन्हात गॉगल, छत्री, पादत्राणे वापरणे

  • पाळीव प्राण्यांना सावलीत, थंड ठिकाणी ठेवा

  • ओलसर पडदे, पंखा, कुलर यांच्या मदतीने घर थंड ठेवा

हे करू नका

  • शक्यतो उन्हाच्या वेळेत घराबाहेर जाणे टाळा

  • पार्क केलेल्या वाहनात लहान मुलांना ठेवू नका

  • उन्हाच्या काळात स्वयंपाक करणे टाळा

  • मद्य, चहा, कॉफी, सॉफ्टड्रिंक्स टाळा

उपचार

  • साधा साबण वापरून आंघोळ करावी

  • कातडीवर फोड असतील तर वैद्यकीय सल्ला घ्या

  • रुग्णाला सावलीत आणि थंड जागी हलवा, थोडे थोडे पाणी प्यायला द्या, उलटी झाल्यास पाणी देऊ नका

  • रुग्णाला थंडजागी शक्यतो एसीमध्ये झोपवा, ओल्या थंड फडकाने अंग पुसून घ्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com