Health Care : आहारात मीठाचा वापर कमी करा, अन्यथा उच्च रक्तदाब अन् किडनीच्या आजारांचा वाढेल धोका

Health Care : मीठाचा अतिरेक केल्यास उच्च रक्तदाब, किडनीचा आजार, स्ट्रोकची जोखीम वाढते. अतिरिक्त मिठाचे सेवन हे उच्च रक्तदाबाचे सर्वाधिक महत्त्वाचे कारण ठरते.
Health Care
Health Careesakal

Health Care : आजच्या धकाधकीच्या, स्पर्धात्मक, यांत्रिक युगात तणावाचे प्रमाण वाढल्याने तरुणाई उच्च रक्तदाबाच्या विळख्यात अडकत आहे. उच्च रक्तदाब नियंत्रणात न आल्यास हृदयविकारापासून इतर दुष्परिणाम होऊ शकतात. आहारात मिठाचा वापर कमी करावा. दिवसभर आहारातून ११ ग्रॅम मीठ शरीरात जाते. हे प्रमाण अधिक आहे. हे प्रमाण ५ ग्रॅमपर्यंत कमी केल्यास रक्तादाबाची पन्नास टक्के जोखीम दूर होईल, असे निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदविले.

फलदायी आहार

 • संपूर्ण धान्य

 • फळे

 • भाज्या

 • डाळी

 • मोड आलेले कडधान्य

 • दही

जोखीम असलेला

 • मॉडर्न आहार

 • मिठाचा अतिरिक्त वापर

 • डालडा

 • पाम देल

 • मैदा युक्त कर्बोदके

लपलेल्या मिठापासून राहा सावध

 • आहारातील तीन चतुर्थांश सोडियम अल्ट्रा-प्रक्रिया केलेले पदार्थ.

 • ब्रेड, सॉस आणि ड्रेसिंग्ज, बेकरी पदार्थ आणि कुकीजमध्ये मिठाची चव नसते.

 • रेडी फूड्स प्रक्रिया केलेले मांस आणि चीजमधून येते, यात मिठाचा प्रयोग होतो.

मिठाचे सेवन कमी करण्यासाठी

 • चपाती, पुरी, पराठे, तांदूळ, कणकीत मीठ घालू नका

 • सॅलड, कापलेली फळे, दही यावर मीठ शिंपडू नका.

 • चटण्या, लोणची घरी तयार करून ठेवा.

 • मिठाऐवजी सलाडवर जिरे पूड किंवा मिरे पूड घालावी.

 • ताकामध्ये चावी साठी पुदिना कोथिंबीरचा वापर करू शकता

 • स्वयंपाक करताना मिठाचा वापर हळूहळू कमी करा

उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी

 • आहारात चपाती, भाकरी, वरण, उसळी, कोशिंबीर, रायत्याचा समावेश करावा.

 • जवस चटणीचा वापर दररोज आहारात असावा.

 • भाज्यांचे थालीपीठ, पोहे, धिरडे, ढोकळा, इडली सॅमबर, उत्तपाचा समावेश करावा.

 • टरबूज, पेरू, पपई, साखर व सोडियमयुक्त थंड पेयापेक्षा लस्सी, नारायचे पाणी, लिंबू सरबत घ्यावे.

 • तंबाखू किंवा सिगारेट पूर्ण बंद करा.

 • मद्यपान करू नका.

मीठ हा आपल्या अन्नामध्ये वापरला जाणारा सामान्य घटक आहे. खारट चव जोडण्यासाठी आणि जतन करण्यासाठीचे एक खनिज आहे. सुमारे ४० टक्के सोडियम आणि ६० टक्के क्लोराईडचे बनलेले असते. मिठाचा अतिरेक केल्यास उच्च रक्तदाब, किडनीचा आजार, स्ट्रोकची जोखीम वाढते. अतिरिक्त मिठाचे सेवन हे उच्च रक्तदाबाचे सर्वाधिक महत्त्वाचे कारण ठरते. यामुळे फूड सेफ्टी स्टॅण्डर्ड ॲथॉरिटी ऑफ इंडियातर्फे ''इट राइट इंडिया'' मिठाच्या कमी वापरासाठी राष्ट्रीय चळवळ सुरू केली.

- डॉ. रेणुका माईंदे, आहारतज्ज्ञ, नागपूर.

आहाराच्या सवयींमध्ये झालेल्या बदलातून रक्तदाब वाढल्याचे दिसून येते. अशावेळी तातडीने रक्तदाब कधी मोजावा चालल्यावर चक्कर येत असल्यास, दम लागत असल्यास, परिवारात रक्तदाबाचे रुग्ण असल्यास, ताणतणावयुक्त जीवनशैली असल्यास, लठ्ठपणा व मधूमेहाचा त्रास असल्यास रक्तदाब मोजण्याचा संकल्प प्रत्येकाने करावा.

- डॉ. अमेय बीडकर, हृदयरोगतज्ज्ञ, नागपूर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com