गरीब लोकांच्या तुलनेत श्रीमंत लोकांना कॅन्सर होण्याचा धोका अधिक; संशोधनातून दावा

New Study claims Risk Of Cancer: काही कॅन्सरचे प्रकार श्रीमंत लोकांमध्येच जास्त आढळून येत असल्याचं एका संशोधनात सांगण्यात आलं आहे
New Study
New Study

नवी दिल्ली- सर्वसाधारण असा समज समज असतो की जे जास्त गरीब असतात त्यांच्यामध्ये आजाराचे प्रमाण जास्त असते. श्रीमंत लोकांमध्ये आजारी होण्याचं प्रमाण कमी असतं असंही आपल्याला वाटतं. पण, काही कॅन्सरचे प्रकार श्रीमंत लोकांमध्येच जास्त आढळून येत असल्याचं एका संशोधनात सांगण्यात आलं आहे. फिनलँडच्या हेलसिन्की विद्यापीठाने यासंदर्भात एक संशोधन केले आहे.

लोकांची आर्थिक स्थिती आणि त्यांना होणारे आजार यामधील सहसंबंध तपासण्यासाठी हा अभ्यास करण्यात आला होता. त्यामध्ये असं समोर आलंय की, जे लोक श्रीमंत असतात त्यांना कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते. श्रीमंतांमध्ये ब्रेस्ट, प्रोस्टेट आणि इतर प्रकारच्या कॅन्सरचा धोका जास्त असतो असं अभ्यासातून समोर आलंय.

New Study
Career In Health : रुग्णसंख्या, वैद्यकीय मनुष्यबळ, उपकरणे, औषधे, पायाभूत सुविधा यामुळे आरोग्यातील करियरच्या संधी वाढल्या

जे जास्त श्रीमंत असतात त्यांच्यामध्ये डायबिटिज, तणाव, संधिवात, लंग कॅन्सर अशा प्रकारचे आजार जास्त आढळतात असं न्यू यॉर्क टाईम्समधील रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. जास्त उत्पन्न गटात मोडणाऱ्या देशांमधील लोकांमध्ये आढळणाऱ्या १९ आजारांचा अभ्यास या संशोधनात करण्यात आला होता.

अभ्यासामध्ये ३५ ते ८० या वयोगटातील २,८०,००० लोकांचा आरोग्य डेटा गोळा करण्यात आला आहे. त्यांच्या आर्थिक स्तरावरून त्यांना वेगवेगळ्या गटात ठेवण्यात आले होते. वयानुसार आणि जेंडरनुसार लोकांमध्ये आजारात फरक असल्याचं संशोधनात आढळून आलं आहे, असं डॉक्टर हेगेनबीक म्हणाल्या.

New Study
World Digestive Health Day 2024 : शरीराची बिघडलेली पचनसंस्था फटक्यात होईल ठिक, फक्त हे पाणी प्यायला सुरू करा

त्यामुळे आपल्या आर्थिक स्तरावरून आजारामध्ये बदल होऊ शकतो. काही आजार श्रीमंत लोकांमध्ये होण्याचा सर्वाधिक धोका असतो असं हे संधोधन सांगतो. दरम्यान, संशोधक आता व्यवसाय आणि आजार यामधील सहसंबंध शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com