

Fungal Infection Treatment: फंगल इन्फेक्शन हा एक त्रासदायक त्वचारोग आहे. ज्याला रिंगवर्म देखील म्हणतात, हा इतका सामान्य आजार नसला तरी गेल्या काही वर्षामध्ये त्याचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. फंगल इन्फेक्शन आपल्या त्वचेच्या कोणत्याही भागात होऊ शकते. त्यामुळे फंगल इन्फेक्शन भागात प्रचंड खाज सुटते. या समस्येवर मात करण्यासाठी बाजारात अनेक औषधे आणि स्किन क्रीम उपलब्ध आहेत. परंतु आज आपण अशा काही घरगुती टिप्स जाणून घेणार आहोत, ज्यांच्या वापर करून तुम्ही सहज फंगल इन्फेक्शनपासून सुटका मिळवू शकता चला तर मग बघू या टिप्स ज्या फंगल इन्फेक्शनपासून सुटका देतील
1. अॅपल सायडर व्हिनेगर (Apple Cider Vinegar)
अॅपल सायडर व्हिनेगरमध्ये अँटी-फंगल गुणधर्म आढळतात, जे फंगल इन्फेक्शनच्या शत्रूसारखे काम करतात आणि अॅपल सायडर व्हिनेगरच्या मदतीने कॅन्डिडा फंगल इन्फेक्शनवर देखील उपचार केले जाऊ शकतात. यासाठी कापसाचा तुकडा व्हिनेगरमध्ये भिजवून प्रभावित भागावर लावा. साधारण 3 दिवस असे केल्यानंतर तुमचे इन्फेक्शन गायब होण्यास आपोआप सुरुवात होईल.
2. कोरफड (Aloe Vera)
परसबागेतील कोरफडीच्या मदतीने त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात हे आपणा सर्वांना माहीत आहे, परंतु तुम्हाला माहिती आहे का की फंगल इन्फेक्शनपासूनही सुटका मिळू शकते. यासाठी कोरफडीची साल काढून त्याचे जेल संसर्ग झालेल्या ठिकाणी लावा, असे दिवसातून 4 ते 5 वेळा केल्यास इन्फेक्शन गायब होईल.
3. लसूण पेस्ट (Garlic Paste)
फंगल इन्फेक्शनची खाज खूपच त्रासदायक असते, परंतु लसणाच्या वापराने फंगल इन्फेक्शनपासून मुक्त होऊ शकता. यासाठी प्रथम लसणाच्या कळ्या वेगळ्या करून त्या मिक्सरमध्ये बारीक कराव्या. नंतर त्या पेस्ट मध्ये खोबरेल तेलाचे (Coconut oil) थेंब टाकून पेस्ट चांगली एकजीव करावी आणि इन्फेक्शनच्या भागावर लावावी आणि ती पेस्ट एक ते दोन तास राहू द्यावी. असे केल्याने तुम्हाला फंगल इन्फेक्शनपासून मुक्ती मिळेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.