Skin Care Tips : या ५ गोष्टी करा त्वचा राहिल फुलांप्रमाणे नाजूक

संवेदनशील त्वचेसाठी अशी घ्या काळजी
Skin Care Tips
Skin Care Tips

आयुष्यभर आपली त्वचा एकसारखी राहत नाही. त्यात वातावरण, खाण्यापिण्याच्या सवयी यामुळे बदल होऊ शकतात. विशेषतः जर त्वचा नाजुक असेल तर थोड्याशा बदलानेही यावर एक्ने, आग होणे किंवा अन्य प्रकारचे ईन्फेक्शन होऊ शकते.

त्वचा आपल्या शरीराचा महत्वाचा भाग असून तो फार नाजुक असतो. म्हणून त्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. काहींची त्वचा कोरडी, काहींची ऑयली तर काहींची कॉम्बिनेशन असते. तसेच काहींची फारच नाजुक असते. त्यामुळे थोड्याही बदलावर लगेच रिॲक्ट करते.

Skin Care Tips
पायांवरील मृत त्वचा कशी काढून टाकाल ?

तर चला जाणून घेऊया संवेदनशील किंवा नाजुक त्वचेची काळजी कशी घ्यावी.

सनस्क्रीनचा वापर नक्की करावा

सूर्य किरणांमधून निघणारे यूवी किरणे त्वचेला मोठ्याप्रमाणात नुकसान पोहचवतात. ज्यामुळे त्वचा लाल होणे, खाज येणे, कोरडी होणे असे त्रास होतात. त्यामुळे सनस्क्रीन लावणे फार आवश्यक असते. सर्व त्वचा प्रकाराच्या लोकांनी सनस्क्रीन लावणे आवश्यक असते.

Skin Care Tips
उन्हाळ्यात चेहऱ्याची त्वचा कोरडी पडतेय ? हे उपाय नक्की करा...

त्वचेला प्रदुषणापासून वाचवा

त्वचेची आग होणे यामागे अनेक पर्यावरणीय कारणे असतात. त्वचा सुरक्षित ठेवण्यासाठी दिवसातून कमीतकमी दोन वेळा चेहरा धुवावा. यामुळे त्वचाशी निगडीत समस्यांना कारणीभूत असणारी घाण, किटाणू आणि अशुध्दी यामुळे निघून जाते.

Skin Care Tips
पाताळगंगा नदीचे प्रदुषण आटोक्यात

स्कीन केअर प्रॉडक्टस निवडताना काळजी घ्या

स्कीन केअर प्रॉडक्टसमध्ये अशा काही गोष्टी असतात ज्याचा थेट परीणाम त्वचेवर होतो. ज्यामुळे त्वचेवर एक्ने, आग होणे एवढेच नव्हे तर सूज येते. यासाठी चांगल्याप्रतीचे नैसर्गिक आणि ऑरगॅनिक प्रॉडक्टस निवडा.

Skin Care Tips
फ्रिजमध्ये ठेवा हे ब्युटी प्रॉडक्टस, कधीही होणार नाहीत खराब

झोपण्यापूर्वी मेकअप न विसरता काढावा

झोपण्यापूर्वी मेकअप न विसरता काढावा. हे सर्व स्कीन प्रकाराच्या लोकांनी करणे गरजेचे आहे. जर मेकअप काढला नाही तर त्वचेवरील पोर्स बंद होतात. ज्यामुळे पिंपल्स सुरू होतात.

Skin Care Tips
पावसाळ्यात मेकअप खराब होऊ नये, म्हणून कोणती काळजी घ्यावी? पाहा..

त्वचेवर प्रेम करा

आपली त्वचा हेल्दी ठेवण्यासाठी त्यावर प्रेम करणे फार आवश्यक असते. आपल्या त्वचेवर हार्श केमिकल्सचा वापर करू नये. स्क्रब करतानाही हलक्या हाताने करावे, जोराने रगडू नये.

Skin Care Tips
उजळ त्वचेसाठी वापरा बदाम-दही फेस स्क्रब

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com