

Surge in Appendicitis Among Children Raises Concerns Over Online Junk Food Habits
sakal
जंक फूड, फास्ट फूड, प्रोसेस्ड तसेच ऑनलाइन मागवले जाणारे खाद्यपदार्थ मुलांच्या आरोग्यासाठी घातक ठरत आहे. १५ वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये या चुकीच्या आहारपद्धतीमुळे अपेंडिसायटिसचा धोका वाढत आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) दरवर्षी ८ ते १० बालरुग्णांवर अपेंडिसायटिससाठी उपचार केले जात होते. मात्र, सध्या ही संख्या दुपटीने वाढली असून आता १५ ते २० मुले आढळून येत आहेत. खासगी रुग्णालयांमध्येही हीच स्थिती असून, पूर्वी ४ ते ६ रुग्ण असताना आता दरवर्षी १० ते १२ रुग्ण आढळत आहेत.