

Rising Cancer Risk Among Women in Maharashtra | Nagpur Leads in Health Screenings
sakal
Maharashtra Health News: गेल्या काही वर्षांत कर्करोगाचे प्रमाण वाढले असून महिलांमध्ये कर्करोगाचे वाढते प्रमाण चिंतेचा विषय बनला आहे. राज्यातील कर्करोग रुग्णांचा शोध घेत निदान व वेळीच उपचार करणे शक्य व्हावे, यासाठी राज्यात आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. यात एक कोटी ५१ लाख १० हजार महिलांची तपासणी करण्यात आली असता १७हजार ६१८ महिलांना मुख कर्करोगाचे निदान झाले. तर, ४५० महिलांना स्तनाचा कर्करोग झाल्याचे समोर आले. विशेष म्हणजे, सर्वाधिक संशयित रुग्ण नागपूर जिल्ह्यात आढळून आले आहेत.