Rising Risk of Hand, Foot, and Mouth Disease in Children
sakal
How to Protect Kids from Hand, Foot, and Mouth Disease at Home: शहरात लहान मुलांमध्ये 'हँड, फूट अँड माउथ' या विषाणुजन्य आजाराने डोके वर काढले आहे. गेल्या काही आठवड्यांपासून खासगी दवाखान्यांमध्ये या आजाराची लक्षणे असलेली लहान मुले मोठ्या संख्येने उपचारासाठी येत आहेत. पाच वर्षांखालील बालकांमध्ये या संसर्गाचा विशेष प्रादुर्भाव दिसत असून, तोंडात फोड, हात-पायांवर पुरळ, ताप आणि अशक्तपणा अशी लक्षणे आढळत आहेत. बालरोगतज्ज्ञांनी पालकांना सतर्क राहण्याचे आणि स्वच्छतेचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.