
रोटा-कट अँजिओप्लास्टी बायपास शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांमधील कॅल्शिअमयुक्त ब्लॉकेज प्रभावीपणे काढते, रक्तप्रवाह सुधारते.
ही कमी आक्रमक प्रक्रिया आहे, जी पारंपरिक बायपास शस्त्रक्रियेच्या तुलनेत जलद पुनर्प्राप्ती देते.
रोटाब्लेशनमुळे स्टेंट बसवणे सोपे होते, ज्यामुळे दीर्घकालीन यशस्वी परिणाम मिळतात.
पूर्वीच बायपास शस्त्रक्रिया केलेल्या 50 वर्षीय रुग्णाच्या हृदयातील अत्यंत कठीण आणि पूर्णपणे कॅल्शिअमयुक्त नळीतील अडथळ्यावर रोटा-कट अँजिओप्लास्टी या प्रगत पद्धतीने उपचार करण्यात आले. या गुंतागुंतीच्या प्रक्रियेत मेडिकव्हर रुग्णालयातील डॉक्टरांना यश आले आल्याचे हृदयरोगतज्ञ डॉ. कुलदीप तोतावार यांनी सांगितले.