

नवी दिल्लीः सब्जा बियांचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. या बिया भिजवून दुधामध्ये, पाण्यामध्ये, सरबतमध्ये किंवा इतरही काही थंड पेयांमध्ये टाकून सेवन केल्या जातात. डॉ. सौरभ सेठी यांनी सब्जा बिया खाण्याचे फायदे सांगितले आहेत. जेव्हा या बिया पाण्यात भिजवल्या जातात तेव्हा जेलीसारख्या बनतात. यामुळे पचनक्रिया सुधारते, भूक कमी लागते आणि शरीर हायड्रेड राहाते.