Sadhguru's guidance on the importance of meditation and letting go of constant logical thinking
sakal
सद्गुरू, ईशा फाउंडेशन
सद्गुरू: आपले तर्कशुद्ध मन हे नेहमीच तुम्ही जमा केलेल्या भूतकाळातील गोष्टींबद्दल असते; ते कधीच आत्ता सध्या घडत असलेल्या क्षणाबद्दल नसते. जीवनाच्या भौतिक पैलूंना हाताळण्यासाठी ते एक उपयुक्त साधन आहे; पण जर तुम्ही ते तुमचे संपूर्ण जीवन हाताळण्यासाठी वापरले, तर ते पूर्णपणे गोंधळ निर्माण करते. तुम्ही या गोष्टीकडे तर्काच्या दृष्टिकोनातून पाहिले, तर सकाळी उठून अंथरुणातून बाहेर पडणे हे देखील एक खूप मोठे काम वाटेल. मग त्यानंतर दात घासणे, खाणे, काम करणे, खाणे, काम करणे, खाणे, झोपणे; आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी याच गोष्टी करणे. जीवनभर तुम्हाला याच गोष्टी पुनःपुन्हा करत राहाव्या लागतात. जर तार्किक दृष्टिकोनातून याकडे पाहिले, तर हे सार्थक आहे असे वाटते का? अजिबात नाही, नाही का? तुम्ही तुमच्या जीवनाच्या अनुभवाकडे पाहिले, तर कदाचित तुम्ही सूर्योदय पाहिला असेल आणि ते सार्थक वाटेल. कदाचित तुम्ही आकाशातील पक्षी, तुमच्या बागेत उमललेली फुले किंवा तुमच्या मुलाचा चेहरा पाहिला असेल, तर ते सार्थक वाटेल. पण जर तुम्ही या गोष्टींकडे तर्काच्या दृष्टिकोनातून पाहिले, तर अत्यंत तर्कशुद्धतेचे क्षण म्हणजे आत्महत्येचे क्षण असतात.