

Summary
दिल्लीचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. शैलेश सिंह यांनी समोशावर आधारित एक विनोदी पण गंभीर आरोग्य संदेश शेअर केला.
त्यांच्या मते, एका समोशाची खरी किंमत ३ लाख रुपये आहे — कारण तो हृदयरोगाला कारणीभूत ठरू शकतो.
१५ वर्षे नियमितपणे समोसा खाल्ल्यास ९०,००० रुपये खर्च होतात, पण आरोग्यहानी ही खरा तोटा आहे.
भारतासह अनेक देशात समोसा हा अनेक लोकांच्या जिव्हाळ्याचा पदार्थ आहे. काही राज्यात चहा सोबत, नाश्त्याला किंवा अगदी लग्नसमारंभात देखील समोशाचा समावेश असतो. कुठेही सहज उपलब्ध होणाऱ्या या पदार्थाची खरी किंमत किती? तर तुम्ही १५ किंवा २० रुपये सांगाल, पण हृदयरोगतज्ज्ञांच्या दृष्टिकोनातून ती ३ लाख रुपये असू शकते. तुम्हाला धक्का बसला आहे का? तुम्ही ज्या समोशाचा आस्वाद घेत आहात तो तुम्हाला केवळ समाधान देत नाही तर हृदयरोगालाही कारणीभूत ठरतो, ज्याची किंमत वर नमूद केलेली आहे.