तर काय?

संतुलनमध्ये उपचार घेऊन माझ्या ४२ वर्षाच्या मैत्रिणीला नुकतीच गर्भधारणा झालेली आहे. तिने मला तुमच्याकडे उपचार घेण्याचा सल्ला दिला आहे.
Pregnant women biliousness
Pregnant women biliousnesssakal

प्रश्र्न १- संतुलनमध्ये उपचार घेऊन माझ्या ४२ वर्षाच्या मैत्रिणीला नुकतीच गर्भधारणा झालेली आहे. तिने मला तुमच्याकडे उपचार घेण्याचा सल्ला दिला आहे. माझे वय ३८ वर्षे आहे. माझ्या लग्नाला ७ वर्षे झाली आहेत. एकदाही गर्भधारणा झालेली नाही. जास्त बीज तयार करण्यासाठी इंजेक्शन घेऊन उपचार करण्याचा प्रयत्न केला पण यश मिळालेले नाही. आयव्हीएफ करण्याची आमची ऐपत नाही. काही नैसर्गिक उपचारपद्धतीची आम्हाला मदत होऊ शकेल का?

- विद्या भोर, नवी मुंबई

उत्तर - गर्भधारणा होण्यासाठी स्त्रीबीज (ओव्हम) व पुरुषबीज (स्पर्म) या दोन्हींमध्ये शक्तिसंपन्नता असणे आवश्यक असते. या शक्तीच्या अभावात गर्भधारणा होतच नाही व झालीच तर नऊ महिने गर्भाचा व्यवस्थित विकास होऊन मूल होणे अवघड असते. त्यामुळे तज्ज्ञांकडून व्यवस्थित प्रकृतिपरीक्षण करून घेऊन गर्भधारणेची क्षमता वाढविण्यासाठी काय उपाय करता येतील याबद्दल मार्गदर्शन घ्यावे. व्हिटासॅन, संतुलन फलमाह, संतुलन धात्री रसायन, संतुलन आत्मप्राश वगैरेंसारखी रसायने शरीरात वीर्यशक्ती वाढविण्यासाठी मदत करतात.

तसेच संतुलनाच्या दृष्टीने स्त्रियांनी फॅमिसॅन तेल व पुरुषांनी संतुलन पुरुषम् तेल वापरणे इष्ट ठरते. वयाचा विचार करता दोघांनीही देहशुद्धीसाठी संतुलन पंचकर्म करून घेणे उत्तम. यातील बस्ती व उत्तरबस्तीचा उपचार करून घेणे अत्यंत उत्तम. तसेच यजमानांनी रोज संतुलन चैतन्य कल्प व आपण स्त्री संतुलन कल्प घालून दूध घेणे उत्तम राहील. वीर्यवृद्धी व वीर्यशुद्धीसाठी अजून बरीच माहिती यू ट्यूब चॅनेल डॉ. बालाजी तांबे व डॉ. मालविका तांबे यावर आहे ती कृपया बघावी.

प्रश्र्न २ - माझे वय २४ वर्षे आहे. मला सतत पित्ताचा खूप त्रास होतो. उन्हाळ्यात उन्हात गेल्यास त्वचेवर रॅश येतो. तसेच सतत मान दुखत असते. यावर काय उपचार करता येतील?

- विशाखा साठे, नाशिक

उत्तर - पित्ताची प्रकृती असल्यास उष्णता व उन्हाळा दोन्ही सहन होत नाही. अशा वेळी जास्त काळजी घेणे आवश्यक असते. अशा वेळी रोज सकाळी एक चमचा संतुलन गुलकंद स्पेशल (प्रवाळयुक्त) घेण्याचा उपयोग होतो. अनाशेपोटी गुलकंद घेतला गेला तर दिवसभरात त्रास होण्याचे प्रमाण खूप कमी होते. दिवसभर वरचेवर साळीच्या लाह्यांचे पाणी, नारळाचे पाणी, कोकम सरबत घेण्याचा उपयोग होईल.

जेवणात साजूक तुपाचा तसेच लोण्याचा समावेश नक्की करावा. सकाळी व संध्याकाळी संतुलन पित्तशांतीच्या २-२ गोळ्या व रात्री झोपताना सॅनकूल चूर्णासारखे चूर्ण नक्की घ्यावे. दिवसभरात किंवा रात्री झोपताना जमत असल्यास पादाभ्यंग घृत लावून पादाभ्यंग करणे उत्तम. फार जास्त त्रास होत असल्यास शास्त्रोक्त पद्धतीने संतुलन पंचकर्म करून त्यात विरेचन करून घेणे चांगले, जेणेकरून वारंवार अशा प्रकारचा त्रास होणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com