Office Back Pain Relief Tips: ऑफिसमध्ये बसून बसून पाठ आखडलीये? मग 'हे' सोपे उपाय ठरतील रामबाण

How to Avoid Back Pain While Sitting in Office: ऑफिसमध्ये बसून बसून पाठ दुखतेय? मग ‘हे’ ५ उपाय वापरून वेदनांपासून सुटका मिळवा!
OFFICE BACK PAIN RELIEF TIPS
OFFICE BACK PAIN RELIEF TIPSsakal
Updated on

Best Stretches to Relieve Back Pain at Work: आजकाल अनेकांचे काम कंप्युटरसमोर बसूनच चालते. आठ ते दहा तास खुर्चीवर बसून काम करणे आणि त्याव्यतिरिक्त प्रवास यामुळे पाठदुखी, मान दुखणं आणि कंबरदुखी ही सामान्य तक्रार बनली आहे. मात्र, ही त्रासदायक वेदना टाळायची असेल तर काही सोप्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. योग्य पोश्चर, वेळच्या वेळी ब्रेक्स आणि लहानसहान बदल हे या समस्येवर कायमचा उपाय ठरू शकतात.

चला जाणून घेऊया अशा पाच सोप्या सवयी ज्या अंगीकारल्या तर ऑफिसमध्ये बसून काम करतानाही शरीर निरोगी राहू शकते –

दर तासाला थोडीशी हालचाल

सतत खुर्चीवर बसून राहिल्यामुळे स्नायूंमध्ये ताण येतो आणि शरीरात रक्ताचा नीट प्रवाह होत नाही. त्यामुळे दर ४५ ते ६० मिनिटांनी खुर्चीवरून उठून थोडं चाला, पाणी प्या किंवा काम थांबवून थोडा ब्रेक घ्या. अशाने शरीराला थोडा आराम मिळतो आणि फ्रेश वाटतं.

बसाताना योग्य पोश्चर ठेवा

खुर्चीत टेकून सरळ बसणं ही पाठदुखी टाळण्याची पहिली पायरी आहे. पाठीच्या खालच्या भागाला पाठिंबा देणारी खुर्ची वापरणे, खांदे सैल ठेवणे आणि पाय पूर्णपणे जमिनीवर सरळ ठेवणे आवश्यक आहे. जर पाय हवेत राहिले तर फुटरेस्टचा वापर करावा. कंप्युटर स्क्रीन डोळ्याच्या समोरच असावी, त्यामुळे मान पुढे झुकवावी लागणार नाही.

शरीर हायड्रेटेड ठेवा

पाण्याच्या कमतरतेमुळे केवळ त्वचा नाही तर मणक्यांतील डिस्क्सही प्रभावित होतात. शरीरातील ओलसरपणा टिकवून ठेवण्यासाठी दिवसभर पुरेसे पाणी पिणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळे मणक्यांवरील दाब कमी होतो आणि पाठदुखी होण्याचा धोका टळतो.

एर्गोनोमिक खुर्ची निवडा

ऑफिससाठी योग्य खुर्ची निवडणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. पाठीला चांगला आधार देणाऱ्या आणि शरीराच्या रचनेला अनुसरून डिझाइन केलेल्या खुर्च्यांचा वापर केल्यास चुकीच्या पोश्चरमुळे होणारा ताण टाळता येतो.

सोपे स्ट्रेचेस करा

ऑफिसच्या खुर्चीवर बसूनसुद्धा काही हलक्या स्ट्रेचिंग क्रिया करता येतात. मान एका बाजूने दुसऱ्या बाजूला वळवणे, खांदे वर-खाली करणे, हात वर करून पाठीला सौम्य झुकवणे अशा हालचालींमुळे तणाव कमी होतो आणि स्नायूंना आराम मिळतो.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com