Sciatica : सायटिका म्हणजे काय? या आजाराने त्रस्त असलेल्यांनी हा उपाय करावा; जाणून घ्या फायदे

या उपायाने तुम्हाला सायटिकाच्या आजारातून थोडा आराम मिळेल
Sciatica
Sciatica esakal

Sciatica : सायटिकाचा त्रास हा असह्य असतो. यामध्ये तुमच्या कंबरेपासून ते पायापर्यंत असह्य वेदना होतात. या आजाराने त्रस्त असलेल्यांनी दूध आणि लसणाचा वापर करत हा खास उपाय करावा. या उपायाने तुम्हाला सायटिकाच्या आजारातून थोडा आराम मिळेल. चला तर जाणून घेऊया या आजाराबाबात आणि त्यावरील उपायांबाबत सविस्तर.

सायटिका म्हणजे काय?

संधीवातात ज्याप्रमाणे हातापायांचे दुखणे जाणवते. अगदी त्याप्रमाणेच सायटिकाचा त्रास असलेल्यांना कंबरेपासून तळपायापर्यंत असह्य वेदना जाणवतात. या वेदनेत व्यक्तीस नीट उभेही राहता येत नाही किंवा नीट बसतासुद्धा येत नाही.

सायटिकाच्या त्रासात लसूण आणि दूधाचा वापर कसा करावा?

सायटिकाच्या त्रासत तुम्ही लसूण दूध पिऊ शकता. त्यासाठी लसणाच्या कळ्या दूधात उकळून घ्या आणि नंतर ते दूध प्या. लसणाच्या दोन कळ्या एक कप दूधात उकळवा. त्यानंतर ते दूध प्या. हे दूध पिल्यानंतर वेदना कमी होतील आणि तुम्हाला रिलॅक्स फिल होईल.

सायटिका आजारात लसूण आणि दूधाचे फायदे

१) अँटी इन्फ्लेमेटरी गुण

लसणात अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असल्याने शरीरावरील सूजन कमी होण्यास मदत होते. यामुळे तुमच्या नर्वच्या आतील दुखणे कमी होते. विशेष म्हणजे लसूणमध्ये असलेल्या या खास गुणधर्मांमुळे असह्य वेदना कमी होतात आणि रूग्णास थोडा आराम मिळतो. (Bone Health)

Sciatica
Bone Strength: म्हातारपणातही राहतील सगळी हाडं ठणठणीत, खा हे 5 फळं आणि भाज्या

२) दुखण्यात फायदेशीर

लसणाचे दूधाचे अनेक फायदे आहेत. रात्री झोपण्याआधी हे दूध पिल्यास तुमच्या वेदना कमी होतील आणि तुम्हाला चांगली झोप येईल. (Health)

Sciatica
Bone Health: वयाची चाळीशी ओलांडली की तुटू लागतात शरीरातील हाडे, आजपासूनच खायला घ्या ‘हे’ पदार्थ!

३) नर्व्ह्जमधील ताण कमी होतो

सायटिकाच्या त्रासात नर्व्हवर ताण पडून अधूनमधून दुखणे जाणवते. अशा परिस्थितीत, हे दूध हा ताण कमी करते. त्यामुळे जर तुम्हाला हा त्रास सतत होत असेल तर तुम्ही या दुधाचे सेवन करू शकता. फक्त लक्षात ठेवा की तुम्हाला फक्त 1 कप लसूण दूध प्यावे लागेल, त्यापेक्षा जास्त पिऊ नये.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com