बैठी जीवनशैली : सुप्त राक्षस

आधुनिक जीवनशैलीत शारीरिक हालचाल कमी होत चालली असून, अनेक आजारांच्या मुळाशी ही बैठी जीवनशैली आहे.
Exercise

Exercise

sakal

Updated on

- डॉ. प्राजक्ता सहस्रबुद्धे (पीटी), प्राध्यापक आणि सल्लागार, कार्डिओव्हॅस्क्युलर अँड रेस्पिरेटरी फिजिओथेरपी

सिटिंग इज द न्यू स्मोकिंग’ असे आजकाल वारंवार म्हटले जाते. अर्थात, दिवसातील बराचसा वेळ बसून घालवणे - मग ते कार्यालयात असो किंवा घरी - आरोग्यासाठी धूम्रपानाइतकेच घातक ठरू शकते. आधुनिक जीवनशैलीत शारीरिक हालचाल कमी होत चालली असून, अनेक आजारांच्या मुळाशी ही बैठी जीवनशैली आहे.

एखाद्या यंत्राची नियमित देखभाल करण्यासाठी त्याला वंगण घालण्याइतकेच ते नियमित चालू ठेवणे आवश्यक असते; अन्यथा त्याला गंज लागतो. मानवी शरीराचेही तसेच आहे. शरीर सतत हालचालीसाठी बनलेले आहे. हालचाल थांबली, की त्याची कार्यक्षमता हळूहळू कमी होऊ लागते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com