पतीला Sexomania, महिलेने सांगितली आपबीती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Health
पतीला Sexomania, महिलेने सांगितली आपबीती

पतीला Sexomania, महिलेने सांगितली आपबीती

वैवाहिक जीवनात येणाऱ्या वेगवेगळ्या समस्यांमुळे (Marriage Problems) अनेकजण त्रस्त असतात. या समस्या जगासमोर मांडता येत नाही, त्यावर खुलेपणाने बोलता येत नाही त्यामुळे अनेकांची कुचंबन होते. मात्र सेक्सोमॅनियाने (Sexomania) त्रस्त असलेल्या एका पत्नीने तिची समस्या जगासमोर ठेवली आहे. महिलेने पॅरेंटिंग फोरमला सांगितले की, 'तिचा नवरा, झोपेच्या दुर्मिळ विकारामुळे, झोपेत विचित्र वागतो आणि जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न करतो.' ही महिला जवळपास 10 वर्षांपासून पतीसोबत आहे.

हेही वाचा: कोरोनातून बरे झालेल्यांना होतोय ब्रेन फॉग, काय आहेत लक्षणे?

महिलेने दिलेल्या माहितीनुसार, झोपेत नवऱ्याच्या अशा कृत्यांमुळे तिला खूप त्रास होतो. मात्र, तो दररोज रात्री असे करत नाही. मी डोळे उघडले तर त्याचे हात माझ्या अंगावर असतात. माझे डोळे उघडताच मी त्याला जोरात ढकलते कारण माझी झोप मोडते आणि सर्व काही थांबतं. सेक्सोमेनिया हा झोपेचा विकार किंवा पॅरासोमनियाचा एक प्रकार आहेय. यामुळे एखाद्या व्यक्तीला झोपेच्या दरम्यान शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा होते किंवा तो त्यासाठी हालचाल करू लागतो.

स्लीपिंग डिसऑर्डर असलेल्या पीडित पतीच्या कृतीचे वर्णन करताना महिलेने सांगितलं की, झोपेतून उठल्यानंतर अनेक वेळा मी आक्षेपार्ह स्थितीत सापडते. याचा माझ्यावर वाईट परिणाम होतो, कारण मी माझ्या जोडीदाराला 10 वर्षांपासून ओळखते आणि त्याच्यावर विश्वास ठेवते. पण या सगळ्यानंतर मला कुणीतरी वापरत असल्या सारखं आणि असुरक्षित वाटतं. माझं दु:ख शब्दात मांडणं माझ्यासाठी खूप अवघड आहे. ती महिला म्हणाली, 'या गोष्टी करताना मी त्याला एक-दोनदा उठवले आहे. त्याच्या जवळ येण्याच्या आवाजाने माझे डोळे उघडतात. महिलेची परिस्थिती ऐकल्यानंतर पॅरेंटिंग फोरमचे युजर्स तिला वेगवेगळ्या प्रकारचे सल्ले देत आहेत.

हेही वाचा: डेल्टा-ओमिक्रॉननंतर आता फ्लोरोनाची भीती, जाणून घ्या काय आहेत लक्षणे

एका यूजरने महिलेला रात्री रूम सोडून दुसरीकडे झोपण्याचा सल्ला दिला आहे. तर एकाने महिलेला सांगितलं की, यावेळी तिला स्वतःला वाचवण्याची गरज आहे. एका यूजरने लिहिले की, 'तिच्या पतीला हे सर्व आठवते का? माझ्या पतीला सेक्सोमॅनियाचा त्रास होत असायचा. पण हे त्याला कधीच आठवलं नाही. जेव्हा आम्हाला याबद्दल कळलं तेव्हा ते माझ्यासाठी खूप भीतीदायक होते. यात मला बलात्कार झाल्यासारखं वाटलं. यावर उत्तर देताना महिलेने लिहिले, 'नाही, त्याला काहीच आठवत नाही. जेव्हा तो झोपेत पुन्हा पुन्हा प्रयत्न करतो आणि मी ते नाकारते.'

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :health news
loading image
go to top