
Shefali Jariwala death: काटा लगा गर्ल आणि बिग बॉस १३ मधील प्रसिद्ध असलेली अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचे वयाच्या ४२ व्या वर्षी हृदयविकाराने निधन झाले. या घटनेमुळे मनोरंजन उद्योगासह तिच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. शेफाली जरीवालाचा हृदयविकारामुळे मृत्यू ही पहिलीच घटना नाही. त्यामुळे अनेक कलाकारांनाही आपले प्राण गमवावे लागले आहेत. हृदयविकार किती धोकादायक आहे हे जाणून घेतले पाहिजे. तसेच कार्डियक अरेस्ट म्हणजे काय आणि याची लक्षणे कोणती हे जाणून घेऊया.