Shilpa Shetty Yoga Tips : 'हे' योगा म्हणजे ‘सुपर से उपर’; शरीरातील अनेक आजार होणार छुमंतर!

शिल्पा दररोज आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर वर्कआउटचे व्हिडीओ शेअर करत असते.
Shilpa Shetty Yoga Tips
Shilpa Shetty Yoga TipsSakal

Shilpa Shetty Yoga Yoga Tips : अनेक चित्रपटातून उत्कृष्ट अभिनय करून चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे शिल्पा शेट्टीची होय. एका रिऍलिटी शोमध्ये जज असणाऱ्या शिल्पाचा क्यूट अंदाजही पहायला मिळतो. शिल्पा तिच्या फिगर आणि आरोग्याच्या समस्यांबाबतील जागरूक असते. शिल्पा सोशल मीडिया अकाऊंटवरही ऍक्टीव्ह असते. तिच्या चाहत्यांनाही योगासनांमुळे शरीराला मिळणाऱ्या लाभांची माहिती देत असते. शिल्पा दररोज आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर वर्कआउटचे व्हिडीओ शेअर करत असते.

हेही वाचा : गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

शिल्पा शेट्टीने लोकांना फिटनेसचेही वेड लावले आहे. यामूळे ती माध्यमांमध्ये नेहमीच चर्चेत असते. शिल्पा योगा आणि जिम करते. ती सोशल मीडियाद्वारे योगा व्हिडिओ शेअर करून तिच्या चाहत्यांना फिटनेसबद्दल जागरूक करते.

शिल्पाने ‘मंडे मोटिव्हेशन’ म्हणून इंस्टा अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याने तीन स्ट्रेचिंग आसनांबद्दल सांगितले आहे. जे केल्याने शरीराला अनेक फायदे मिळतील. या आसनांनी पोट, फुफ्फुस आणि पचनसंस्थे संबंधित आजारांवर फायदा होतो. त्या आसनांची नावे विरभद्रासन, बध्द विरभद्रासन आणि प्रसारिता पदोत्तानासन अशी आहेत. शिल्पाच्या भाषेत सांगायचे तर हे आसन म्हणजे ‘सुपर से उपर’ आहेत.

Shilpa Shetty Yoga Tips
How to Lose Belly Fat: पोटाचा घेर कमी करायचाय? जेवणानंतर 15 मिनिटे करा 'हा' योगा

या तीन आसनांचा व्हिडीओ शेअर करताना शिल्पाने एक कॅप्शन दिले आहे. धकाधकीचे जीवन आपल्या आरोग्यासाठी किती हानिकारक आहे याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. अशा स्थितीत स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी दररोज बॉडी स्ट्रेचिंग करणे खूप गरजेचे आहे.

मी काही दिवसांपूर्वी विरभद्रासन, बध्द विरभद्रासन आणि प्रसारिता पदोत्तानासनाचा सराव सुरू केला आहे. असे केल्याने केवळ पचनसंस्था आणि पोटच मजबूत होत नाही. तर फुफ्फुस आणि स्तनातील दुखणेही कमी होते. याशिवाय, खांदे, हात, पाय, पाठ आणि मान दुखण्यापासून आराम मिळतो. हे आसन शरीरासाठीच नाही तर मनासाठीही फायदेशीर असल्याचे शिल्पाने सांगितले आहे. मनात सुरू असलेला गोंधळ कमी होतो आणि मन शांत होते. त्यामूळे हे आसन करण्याचा सल्ला शिल्पाने दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com