Child Health: कोट्यवधींचा खर्च तरी उपजत बाल मृत्यू कायमच; सरकारी योजनांना खीळ, तीन वर्षांत पंधरा हजारांवर बालकांचा मृत्यू
Nagpur News: महाराष्ट्रात तीन वर्षांत १५,७२१ उपजत बालमृत्यूंची नोंद झाली आहे. कोट्यवधींचा खर्च असूनही हे मृत्यू रोखण्यात यंत्रणांना यश आलेले नाही. गर्भवती महिलांसाठी वेळेवर उपचार आणि प्राथमिक आरोग्यसेवांचा अभाव ही मुख्य कारणे मानली जात आहेत.
नागपूर : महाराष्ट्रात उपजत बाल मृत्यू रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून कोट्यवधींचा खर्च होतो. त्यानंतरही उपजत बालमृत्यूवर आळा घालण्यात यश आले नाही. गेल्या तीन वर्षांत तब्बल १५ हजार ७२१ उपजत बालमृत्यू झाले.