Ear Cotton Buds: कानातला मळ काढण्यासाठी तुम्हीही कॉटन बड वापरता का? आताच थांबवा नाहीतर... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ear Cotton Buds

Ear Cotton Buds: कानातला मळ काढण्यासाठी तुम्हीही कॉटन बड वापरता का? आताच थांबवा नाहीतर...

शरीरातील इतर अवयवांपैकी कान हा खूप असतो. कानाची विशेष काळजी घेणे गरजेचं असतं. त्यासाठी कानाची स्वच्छता ही खूप महत्त्वाची आहे.  कानात जाणारी धूळ, जंतू आणि इतर गोष्टींपासून कानाच्या संरक्षण करणं हे खूप महत्त्वाचं आहे.

अनेकदा कानात मळ साचतो आणि आपण कानातला मळ काढण्यासाठी कॉटन बड वापर करतो. पण खरंच कानातला मळ काढण्यासाठी कॉटन बडचा वापर करावा का? चला तर जाणून घेऊया. (should we use Cotton Buds for ear wax cleaning read story)

  • कानात मळ साचला की हा मळ बाहेर काढून कान साफ केला, ही आपली पहिली प्राथमिकता असते. त्यासाठी आपण कॉटन बडचा वापर करतो, जे खूप चुकीचं आहे.

  • बड्स हे केवळ कानाचा समोरचा भाग स्वच्छ करण्यासाठी वापरायचे असतात. पण अनेकदा आपण त्याचा वापर कानातला मळ काढण्यासाठी करतो.

हेही वाचा: Cotton Ear Buds: कानातला मळ कॉटन बड्सने साफ करणं योग्य की अयोग्य? वाचा योग्य पद्धत

  • या बड्सच्या बॉक्सवर अशा सूचना पण दिल्या आहेत. मात्र आपण सर्रास कानात कॉटन बड घालून मड काढण्याचा प्रयत्न करतो.

  • बड्सचा वापर करताना हा मळ कानात आणखी आत जाण्याचा धोका असतो. ज्यामुळे कानाच्या पडद्याला इजा होऊ शकते.

टॅग्स :lifestylehealth