Cotton Ear Buds: कानातला मळ कॉटन बड्सने साफ करणं योग्य की अयोग्य? वाचा योग्य पद्धत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cotton Ear Buds

Cotton Ear Buds: कानातला मळ कॉटन बड्सने साफ करणं योग्य की अयोग्य? वाचा योग्य पद्धत

Ear care: निरोगी आरोग्यासाठी शरीराची निगा राखणे फार गरजेचे ठरते. कान, नाक, घसा हे आपल्या शरीराचे फार नाजूक अवयव आहे. तेव्हा यांची काळजी योग्यरित्याच घ्यायला हवी. तुमच्या कानात नैसर्गिकरित्या मेणासारखा पदार्थ असतो. त्याला इयरवॅक्स म्हणजेच कानातला मळ असं आपण म्हणतो. आता हा इयरवॅक्स कानासाठी फायदेदायक आहे की नाही ते आपण जाणून घेऊया.

कानाच्या आतील भागात ईयर कॅनल नावाची एक खास ग्लँड असते. ही ग्लँड कानात मेणासारखा पदार्थ तयार करते. ईयरवॅक्स कानासाठी चांगला असतो. तो कानाला स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यास मदत करतो. इयरवॅक्स धूळ आणि पाण्यापासून कानाचं संरक्षण करते. कानाच्या सॉफ्टस्क्रिनचा डॅमेज होण्यापासूनही बचाव करते. मात्र इयरवॅक्स कानात अधिक प्रमाणात निर्माण झाल्यास नुकसानदायी ठरू शकतो. त्याने ऐकण्याची क्षमता कमी होते. (Health)

अनेक लोक कानाच्या स्वच्छतेसाठी कॉटन बड्सचा वापर करतात. ते वापरणं योग्य की अयोग्य ते आपण जाणून घेऊया. मेंटलफ्लॉसच्या एका रिपोर्टनुसार कानातला मळ वेळोवेळी नैसर्गिकरित्या बाहेर पडतो. त्यामुळे वारंवार कानातला मळ काढण्याची गरज नाही. जेव्हा खाताना तुम्ही एखादी गोष्ट चावत असता तेव्हा त्याचं कनेक्शन कानाशी असतं. त्यामुळे वाळलेला कानातील मळ आपोआप बाहेर पडतो.

कॉटन बड्सचा वापर योग्य की अयोग्य?

कॉटन बड्स किंवा माचिसच्या काडीचा वापर तुमच्या कानासाठी धोकादायक ठरू शकतो. बहुतांश लोक कान साफ करण्यासाठी कॉटन बड्सचाच वापर करत असतात मग त्यात चुकीचं काय असाही प्रश्न तुम्हाला पडला असेलच. मात्र एक्सपर्टच्या मते, कॉटन बड्सच्या वापराने अनेकदा मळ कानाच्या आतल्या भागात पुढे सरकतो. त्यामुळे मळात असलेले बॅक्टेरियासुद्धा कानाद्वारे शरीरात प्रवेश करतात. आणि समस्या उद्भवतात.

हेही वाचा: Gautami Patil Lavani: गौतमीची लावणी कुठे चुकतेय?

काय आहे योग्य पद्धत?

कान साफ करण्याची योग्य पद्धत म्हणजे इयरड्रॉप्स. इयरड्रॉप्समध्ये असणारी औषधे कानातील मळाला एवढं पातळ करतात की मळ आपोआप बाहेर येतो. मळाला पातळ करण्यासाठी तुम्ही बदाम तेलाचाही वापर करू शकता.

डिस्क्लेमर- वरील कुठलाही उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या. यास सकाळ समुह जबाबदार नसणार.

टॅग्स :health