Garlic Side Effects: 'या' लोकांनी चुकूनही लसणाचे पदार्थ खाऊ नये, नाहीतर... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Garlic Side Effects:

Garlic Side Effects: 'या' लोकांनी चुकूनही लसणाचे पदार्थ खाऊ नये, नाहीतर...

Garlic Side Effects: रोजच्या दैनंदिन जेवणात कदाचितच कोणी लसण कांदा फोडणीसाठी वापरत नसेल. बहुतेकांच्या भाजीची फोडणी याशिवाय अपूर्ण असते. मात्र काही लोकांसाठी लसण किंवा लसणाचे पदार्थ खाणे धोकादायक ठरू शकते. आज आपण लसणाचे काही लोकांवर होणारे साइड इफेक्ट्स जाणून घेऊयात.

या लोकांनी लसण खाणे टाळावे

अनेकांना काही रोग किंवा आजारपण जन्मत: असतात पण अशा काही शारिरीक अवस्थेतील लोकांनी लसूण न खाल्लेली बरी. खासकरून जी लोकं रक्त पातळ करण्यासाठी काही औषधं घेतात त्यांनी तरी निदान लसूण खाऊ नये. (Health)

त्याचबरोबर ज्यांना घामामुळे शरीराला दुर्गंध येतो आणि तोंडाला वास येतो त्यांनी लसणाचे सेवन करू नये. लसण खाल्ल्याने त्यांच्या या समस्या कमी होण्याऐवजी आणखी वाढतील. तेव्हा अशांना लसूण आणि लसणाचे पदार्थ खाऊ नयेत.

ज्यांना एसिडिटीचा (acidity) त्रास आहे त्यांनी खासकरून लसूण हा पदार्थ खाऊ नये. त्याचसोबत जर तुम्हाला एसिडिटीचा त्रास खूप दिवस असेल किंवा तो वाढत असेल तर कृपया करून लसणाच्या पदार्थांपासून लांब राहा. तुमची समस्या अजून वाढण्याची शक्यता आहे. त्याचसोबत ज्यांचे पोट कायम खराब राहते त्यांनी तर लसणाचे पदार्थ खाऊ नयेत. रिकाम्या पोटीही अशांना अशाप्रकारे लसणं खाऊ नये त्यानं तुमच्या शरीरावर विपरित परिणाम होऊ शकतो.

हेही वाचा: Health Alert : व्हेज म्हणत तुम्ही चुकून नॉनव्हेज तर खात नाहीये, कसे ओळखाल? हे कोड्स कायम लक्षात ठेवा

लसणाचे फायदे

  • लसणात अँटीबायोटिक्स असतात.

  • लसणानं आपल्या शरीरातील इम्यूनिटी म्हणजे रोगप्रतिकारक्षमताही वाढते.

  • लसूण खाल्ल्यानंतर बल्ड प्रेशर आणि कोलेस्ट्रोल नियत्रंणात राहते.

  • लसणाचा उपयोग आपल्या भारतीय पदार्थांमध्ये सहज होतो त्यामुळे आपण लसणाची फोडणी, तडका आणि चटणी बनवतो.

  • गार्लिक ब्रेडचाही आपल्या ब्रेकफास्टमध्ये उपयोग करून घेतो. ते आरोग्यासाठी फायद्याचे ठरते.