सद्गुरू - हे अस्तित्व जे एखाद्याला पाहणे, ऐकणे, वास घेणे, चव घेणे आणि स्पर्श करणे अशा पाच इंद्रियांच्या माध्यमातून जाणून घेणे शक्य होते, ते एक मुळात कंपनांचे उत्पादन आहे, आवाज किंवा नाद यांचा एक खेळ आहे. मानवाचे शरीर आणि मन हीदेखील कंपने आहेत; पण शरीर आणि मन हे काही साध्य नाही. ते केवळ एका शक्यतेचे बाहेरील आवरण आहे.