

Delayed Testing Causes Late Diagnosis of Prostate Cancer in Men
sakal
बावन्न वर्षीय मधुकर (नाव बदललेले आहे.) यांना कोणताही शारीरिक त्रास नव्हता. त्यांनी वार्षिक आरोग्य तपासण्या केल्या, त्यांच्या रक्तातील विशिष्ट प्रथिनांचे प्रमाण मोजण्यासाठी करण्यात येणाऱ्या 'प्रोस्टेट स्पेसिफिक अँटीजेन' (पीएसए) चाचणीत प्रथिनांचे प्रमाण २२ नॅनोग्राम प्रति मिलिलिटर आढळले. हे सर्वसाधारण ४ असायला हवे. पुढील तपासण्यांमधून त्यांना प्रोस्टेट ग्रंथीच्या कर्करोगाचे निदान झाले. डॉक्टरांनी त्यांच्या कुटुंबीयांचा वैद्यकीय इतिहास जाणून घेतला असता, त्यांच्या मोठ्या भावाचा मृत्यू देखील याच कर्करोगाने झाल्याचे आढळले.
दुसऱ्या रुग्णाच्याही नियमित तपासणीदरम्यान 'पीएसए' चाचणीचा स्कोअर वाढलेला होता. त्यांनाही काही त्रास नव्हता. मात्र, पुढील तपासण्यात त्यांच्याही शरीरात प्रोस्टेट कर्करोगाची नुकतीच सुरवात झाल्याचे आढळले. दोन्ही रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.