

The article highlights traditional Ayurvedic remedies while advising readers to consult qualified medical experts before starting any treatment.
Sakal
डॉ. मालविका तांबे
शरीराची हालचाल होण्याकरता सगळ्यात महत्त्वाचं योगदान असतं ते म्हणजे सांध्यांचं. सांधे अर्थात संधी याचा अर्थ एका जागेवरती दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त हाडं एकत्र येऊन तयार झालेली रचना. या संधीवरती हाडांबरोबरच वेगवेगळ्या मांसपेशी, स्नायू, धमन्या, शिरा एकत्रित येऊन त्या सांध्याला तयार करत असतात. सांधे निरोगी असताना आपण त्यांचा सतत वापर करतो आहे. त्यांच्यावरती जोर पडतो आहे असं काही जाणवत सुद्धा नाही. पण वय वाढल्यामुळे क्वचित कधीतरी मार लागल्यामुळे, पडल्यामुळे किंवा एखादा संक्रमण होऊन ताप आल्यानंतर मात्र हाड आणि सांधे कसे दुखू शकतात याची जाणीव प्रत्येकाला होतेच.