

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत मानसिक ताण हा अनेकांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनला आहे. ऑफिसचा कामाचा दबाव, आर्थिक चिंता, नात्यांमधील मतभेद आणि स्वतःसाठी वेळ न मिळणे यामुळे सतत तणाव जाणवू शकतो. याचा परिणाम केवळ मनावरच नाही, तर एकूण आरोग्यावरही होऊ शकतो.
निरोगी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी जपानी जीवनशैलीतील काही साध्या सवयी उपयोगी ठरू शकतात. दैनंदिन दिनचर्येत या चार गोष्टींचा समावेश केल्यास शरीरासोबतच मनालाही आराम मिळण्यास मदत होऊ शकते.