
Sion Hospital Bone Marrow Transplant Expansion
sakal
Sion Hospital New Facilities 2025: मुंबई महापालिकेच्या लोकमान्य टिळक महापालिका रुग्णालयात (सायन रुग्णालय) आता मोठ्या प्रमाणावर बालकांवर अस्थिमज्जा प्रत्यारोपण (बोन मॅरो ट्रान्सप्लांट) करण्यात येणार आहे. धारावी येथील एकनाथ गायकवाड अर्बन हेल्थ सेंटरमध्ये उभारण्यात आलेल्या नव्या विस्तारित बीएमटी केंद्राचे उद्घाटन रुग्णालय प्रशासन नोव्हेंबर महिन्यात करणार आहे.
या उपक्रमामुळे सरकारी आरोग्य व्यवस्थेत बाल्यावस्थेतील कर्करोग आणि रक्तविकारांच्या उपचारांना बळ मिळणार आहे. या केंद्रामुळे आतापर्यंतच्या तुलनेत सायन रुग्णालयात वार्षिक ४०० टक्के म्हणजेच सुमारे १२० बालकांचे बोन मॅरो प्रत्यारोपण होण्याची शक्यता आहे.