Work From Home दरम्यान या पोझिशनमध्ये लॅपटॉप ऑपरेट करणे धोकादायक, आरोग्याचं होईल वाटोळं

घरी काम करताना बसण्याची योग्य पोझिशन माहिती असावी नाहीतर तुमच्या आरोग्याचं वाटोळं होऊ शकतो
Work From Home
Work From Homeesakal

Work From Home : कोविड काळादरम्यान संसर्ग वाढू नये म्हणून अनेक जणांना वर्क फ्रॉम होम देण्यात आलं होतं. आता हा ट्रेंड झालाय. हल्ली बहुतांश लोकांना हायब्रिड वर्क किंवा सतत वर्क फ्रॉम होमची सुविधा खुद्द त्यांची कंपनीच देते. मात्र घरी लॅपटॉप ऑपरेट करताना आपल्याला ऑफिससारखा कंफर्ट झोन येत नाही. तेव्हा घरी काम करताना बसण्याची योग्य पोझिशन माहिती असावी नाहीतर तुमच्या आरोग्याचं वाटोळं होऊ शकतो. चला तर आज आपण याबाबत सविस्तर जाणून घेऊया.

घरून काम करताना एक वेगळ्या प्रकारचा कम्फर्ट झोन असतो, कारण मग तुम्ही तुमच्या वरिष्ठ किंवा सहकाऱ्याच्या नजरेत नसता, अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या आवडीचे कपडे घालून आरामात काम करू शकता. काही लोकांना आरामाचे इतके व्यसन लागले आहे की ते खुर्ची आणि टेबलाऐवजी बेडवर बसून ऑफिसचे काम पूर्ण करू लागतात. विश्रांतीची ही सवय मात्र तुमच्या आरोग्यासाठी गंभीर ठरू शकते. कसे ते जाणून घ्या. (Health)

Work From Home
Cholesterol Issue : कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी प्या हे चमत्कारी पाणी, त्रास झटक्यात कमी होईल

अंथरुणावर बसून ऑफिशीयल कामे करण्याचे तोटे

वजन वाढणे

घरातून काम केल्यामुळे, गेल्या काही वर्षात लोकांमध्ये शारीरिक हालचाली कमी झाल्या असल्याचे दिसून आले, त्यामुळे अनेकांचे वजन झपाट्याने वाढले आहे. तुम्ही तासनतास त्यासोबत झोपून राहिल्यास पोट आणि कंबरेचीही चरबी आणखी वाढेल. (Office)

Work From Home
Work From Home Jobs : गृहिणींसाठी फायद्याचे कोर्सेस; जे घरबसल्या पैसे मिळवून देतील!

पाठ आणि मणक्याचे दुखणे

जेव्हा तुम्ही बेडवर बसून लॅपटॉपवर काम करता तेव्हा तुमच्या कंबर आणि पाठीची स्थिती बरोबर नसते, त्यामुळे पाठदुखी किंवा पाठीचा कणा दुखू शकतो, त्यामुळे शक्यतोवर खुर्ची टेबलावर बसून काम करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com