
Holi Celebration 2023 : सावधान! होळीच्या रंगांनी होऊ शकतं इन्फेक्शन, 'या' पाण्याने करा आंघोळ
Skin Care Tips For Holi Celebration 2023 : होळीचा सण म्हटला की, रंगाची उधळण ही आलीच. लोक एकमेकांनी रंग लावतात. पण हल्ली बाजारात फार भेसळयुक्त आणि केमिकलने बनवलेले रंग मिळतात. जे लावल्याने स्कीन इन्फेक्शन होऊ शकतं. अशात आज आम्ही तुम्हाला आंघोळीसाठी असं पाणी बनवण्याची टेक्निक सांगणार आहोत की, ज्यामुळे हे इंफेक्शन पसरणार नाही.
तर या दिवशी रंगाने भरलेले अंग स्वच्छ करण्यासाठी हळदीचे पाणी वापरा. हळदीत अँटीऑक्सिडेंटचे गुण असल्याने ते तुमच्या त्वचेसाठी वरदान ठरतात. अशा पाण्याने आंघोळ केली तर त्वचेच्या सर्व इन्फेक्शनपासून वाचू शकतात.
हे पाणी कसे बनवावे याची पद्धत समजून घ्या.
कसे बनवावे आंघोळीचं हळद पाणी
आंघोळीसाठी एक बादली पाणी घ्या. ते कोमट करा.
त्यात एक कप हळद टाका. ते नीट मिक्स करून घ्या.
नंतर या पाण्याने होळीचे रंग खेळून झाल्यावर आंघोळ करा.
सर्व इन्फेक्शन निघून जाईल.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.