Periods Pain : पीरियड्समध्ये होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी या पोझिशनमध्ये झोपा, मिळेल 100% आराम

Menstrual Cramps: औषधांमुळे मासिक पाळीच्या दुखण्यापासून तात्पुरता आराम मिळतो, परंतु दीर्घकाळापर्यंत त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो.
Periods Pain
Periods Painesakal

Best Sleeping Position : मासिक पाळी हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील एक महत्वाचा भाग असतो. महिन्यातील ३ ते ५दिवस चालणाऱ्या या सर्कलमध्ये महिलांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. या काळात रक्तस्रावासह असह्य वेदनांना सामोरे जाणे हे महिलांसाठी एखाद्या चॅलेंजपेक्षा कमी नाही.

मासिक पाळीच्या काळात महिलांना मांड्या, कंबर आणि पोटाच्या खालच्या भागात वेदना होतात. पीरियड्स दरम्यान होणाऱ्या या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी काही महिला औषधे खातात, तर काही बाजारात मिळणारे हीटिंग पॅड वापरतात. औषधांमुळे मासिक पाळीच्या दुखण्यापासून तात्पुरता आराम मिळतो, परंतु दीर्घकाळापर्यंत त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो.

म्हणूनच मासिक पाळीच्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी काही नैसर्गिक पद्धतींचा अवलंब करणे आवश्यक आहे. या वेदनापासून मुक्त होण्याचा नैसर्गिक आणि 100 टक्के सुरक्षित मार्ग म्हणजे योग्य स्थितीत झोपणे.

होय, झोपण्याच्या योग्य स्थितीचा अवलंब केल्याने, तुम्ही केवळ मासिक पाळीच्या वेदनापासून मुक्त होऊ होतनाही, तरक्रॅम्प्स कमी करण्यास देखील मदत होते. आज मासिक पाळीत झोपण्याची पोझिशन कशी असावी याबाबत थोडक्यात सांगणार आहोत.

गुडघ्याखाली उशी घेऊन झोपा

ज्या महिलांना मासिक पाळीच्या वेळी पोटाच्या खालच्या भागात म्हणजेच ओटीपोटात असह्य वेदना होतात त्यांना गुडघ्याखाली उशी घेऊन झोपण्याचा सल्ला दिला जातो. गुडघ्याखाली उशी ठेवून झोपल्याने पाठीवर आणि पोटावरील ताण कमी होतो, ज्यामुळे मासिक पाळीच्या दुखण्यापासून आराम मिळतो.

Periods Pain
Periods Tips While Travelling : प्रवास करताना मासिक पाळी येणं Irritate होतं यार? या टिप्स आजमवा आराम मिळेल!

पोटावर झोपणे

कोणत्याही परिस्थितीत पोटावर झोपणे आरोग्यासाठी चांगले मानले जात नाही, परंतु मासिक पाळीच्या दुखण्यापासून आराम मिळण्यासाठी ही स्थिती चांगली मानली जाते. मासिक पाळी दरम्यान पोटावर झोपल्याने कंबर आणि खालच्या ओटीपोटात पेटके आणि वेदनापासून आराम मिळतो. (Health)

Periods Pain
Periods Pain: मासिक पाळीमध्ये होतात प्रचंड वेदना? मग करा 'हे' सोपे उपाय

पाठीच्या भारावर झोपा

पाठीवर झोपल्याने मासिक पाळी दरम्यान होणारे क्रॅम्प्स कमी होण्यास मदत होते. पाठीवर झोपल्याने पोटावरील दाबदेखील कमी होतो, ज्यामुळे पेटके आणि वेदना कमी होण्यास मदत होते. ज्या लोकांना मासिक पाळी दरम्यान मांड्यामध्ये जास्त वेदना होतात, त्यांना विशेषतः त्यांच्या पाठीवर झोपण्याचा सल्ला दिला जातो. (Menstruation)

हार्मोनल बदलांमुळे मासिक पाळी दरम्यान ओटीपोटात दुखणे आणि पेटके येणे सामान्य आहे. तथापि, ज्या महिलांना जास्त वेदना होतात किंवा मासिक पाळीत वेदना होत असल्याने उठण्या-बसण्यास त्रास होत आहे, त्यांनी ताबडतोब त्यांच्या डॉक्टरांशी किंवा स्त्रीरोगतज्ज्ञांशी संपर्क साधावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com