Social Media Hazards : सोशल मीडियाचे व्यसन धुम्रपानाएवढेच घातक, वेळीच व्हा सावध l Social Media Addiction is As Hazardous As Smoking | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Social Media Hazards

Social Media Hazards : सोशल मीडियाचे व्यसन धुम्रपानाएवढेच घातक, वेळीच व्हा सावध

Social Media Addiction is As Hazardous As Smoking : हल्लीची तरुण पिढी फार टेक्नोसॅव्ही झाली आहे, त्यामुळे ते दिवसरात्र फोन, लॅपटॉप वर इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या विश्वात वावरतात असं म्हटलं जातं. पण हल्ली स्मार्टफोनमुळे फक्त तरुणच नाही तर ज्येष्ठांनाही सोशल मीडियाचं व्यसन लागलं आहे. लहानमुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांच्या माना खाली आणि डोकं फोनमध्ये घातलेलं दिसतं.

हे एकप्रकारचे व्यसनच आहे. यात किती तास निघून जातात याची त्यांना जाणीवहा नसते. पण या व्यसनामुळे मानसिक व शारीरिक आरोग्य धोक्यात आलं आहे.

सोशल मीडियावर आजवर अनेक संशोधनं झाली आहेत. त्यातून लक्षात आलं आहे की, जगात सुमारे ३.१ अब्ज लोक सोशल मीडिया वापरतात, त्यापैकी सुमारे २१० दशलक्ष लोकांना इंटरनेट आणि सोशल मीडियाचं व्यसन लागलं आहे. एका अभ्यासानुसार एक सामान्य माणूस २ ते ४ तास सोशल मीडिया वापतो. तर एक मूल सुमारे ९ तास सोशल मीडियावर घालवते. त्यामुळे सोशल मीडियाचे धोके वेळीच ओळखणे गरजेचे आहे.

रात्रीच्या स्क्रोलींगचे दुष्परिणाम

दिवसभराचे काम संपवून रात्री झोपण्यापूर्वी ऑनलाइन स्क्रोल करत राहणं हे बऱ्याचदा बघायला मिळतं. पण हे स्क्रोलींग काही मिनीटांवरुन कधी काही तासांचं होतं याकडे लक्ष जात नाही, आणि यातून व्यसन जडतं. या व्यसनाला रिव्हेंज बेड टाइम प्रोक्रॅस्टिनेशन असं म्हणतात. काही अभ्यासातून आढळून आलं आहे की, उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयाच्या समस्या तसंच वजन वाढणं आणि नैराश्याच्या समस्या या व्यसनातून निर्माण होतात.

उपाय काय

सोशल मीडिया डिटॉक्स

या व्यसनापासून मुक्त होण्यासाठी सोशल मीडिया डिटॉक्स हा सर्वोत्तम मार्ग आहे. सर्व अॅप्स बाजूला करून फोन फक्त इमर्जंसी कॉलसाठी वापरायचा. या प्रक्रियेत थोडा वेळ लागेल पण तुम्ही व्यसनापासून मुक्त होऊ शकाल.

स्वतःसाठी डिजिटल टाइम निश्चित करा

जर तुम्ही पुर्णपणे अॅप्सपासून दूर होऊ शकत नसाल तर स्वतःसाठी एक डिजिटल किंवा स्क्रीन टाइम ठरवून घ्या. ठराविक वेळच फोन बघायचा. अशा बंधनामुळे तुम्ही या व्यसनातून बाहेर पडू शकतात. ही वेळ सुरुवातीला २ तासांपेक्षा जास्त असू नये. त्यानंतरही हळू हळू त्याहू कमी करत न्यावी.

काहीतरी नवीन शिका

एखादी नवी गोष्ट शिकणं नेहमीच रोचक असतं आणि सोशल मीडियापासून स्वतःला दूर ठेवण्याचा यापेक्षा चांगला मार्ग असू शकत नाही. मग यात तुम्हाला आवडणारी कोणतीही गोष्ट असू शकते.

कुटुंब-मित्रपरिवारासोबत जास्त वेळ घालवा

सोशल मीडियाच्या आहारी गेल्याने तुम्ही मुख्य गोष्ट गमवतात ती म्हणजे कुटुंबाचा आणि मित्राचा सहवास. आता त्यांना जास्त वेळ द्या. शारीरिक आणि मानसिक दोन्ही आरोग्य सुधारण्यास फायदा होईल.

टॅग्स :Social Mediasmokinghealth