- डॉ. मालविका तांबे
पावसाळा म्हटले की सगळ्यांना आठवतो तो आल्याचा गरम चहा आणि मस्त गरम भजी. एवढेच नव्हे तर पावसाळ्याच्या दिवसांत भूक कमी लागते म्हणून चाट खाणारी मंडळी आपल्याला आढळतात. पण आयुर्वेदाच्या मतानुसार पावसाळ्याच्या दिवसांत खूप चटकदार, तळलेल्या गोष्टी न खाणेच हितकर असते.
या काळात पोटातील अग्नी मंदावलेला असल्यामुळे आहार सुपाच्य व सात्त्विक घेणे इष्ट समजले जाते. त्यामुळे अन्न जास्त स्वादिष्ट व पचनाला योग्य बनवायचे असले तर या काळात काही मसाले नियमितपणे वापरणे उत्तम ठरते. या मसाल्यांमुळे अन्न चविष्ट होऊन आरोग्याच्या दृष्टीने जास्त हितकर ठरू शकते. अशा काही मसाल्यांची आज आपण येथे माहिती घेऊ या.