Stress Free Life protein green vegetables include your diet
Stress Free Life protein green vegetables include your diet

Health: तणावाने मनाला मारलीय घट्ट मिठी, तर या पदार्थांचे सेवन करण्याशिवाय पर्याय नाहीच

प्रचंड काम, घरची जबाबदारी, प्रवास या सर्वांमुळे माणुस स्वतःला विसरुन तणावात जगताना दिसत आहे.
Published on

सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात माणसाचा निवांतपणा हरवला गेलाय. प्रचंड काम, घरची जबाबदारी, प्रवास या सर्वांमुळे माणुस स्वतःला विसरुन तणावात जगताना दिसत आहे. ताणतणावाची अनेक कारणे असू शकतात, पण त्यालाही मर्यादा असतात. त्यावर नियंत्रण ठेवले नाही तर ते आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. तणाव कमी करण्यासाठी हेल्दी डाएटची आवश्यकता आहे. त्यासाठीच आम्ही घेऊन आलो आहोत काही टिप्स ज्यामुळं तुम्ही रहाल तणावमुक्त.

तणावमुक्त राहण्यासाठी आहारामध्ये योग्य पदार्थांचा समावेश असणे गरजेचे आहे. तणावमुक्त होण्यासाठी व्हिटॅमिन युक्त पदार्थांचे सेवनही फायदेशीर ठरू शकते. या पदार्थांचे सेवन केल्याने रोग प्रतिकारशक्ती वाढते व निरोगी राहण्यास मदत होते. तर ते कोणते पदार्थ जाणून घेऊ.

Stress Free Life protein green vegetables include your diet
Fish Health Benefits : मेंदूच्या उत्तम आरोग्यासाठी 'हे' मासे आहेत गुणकारी, जाणून घ्या कसा होतो लाभ..

हिरव्या पालेभाज्या

हिरव्या पालेभाज्यांचे सेवन आपल्या आरोग्यासाठी खुप फायदेशीर ठरते. पालेभाज्यामंध्ये पालक खुप फायद्याचा आहे. पालकामध्ये झिंक, मॅग्नेशियम, लोह आणि मॅंगनीज सारखे पोषक घटक असतात, जे मेंदूतील ऑक्सिजनची पातळी वाढवतात आणि आनंदी हॉर्मोन तयार करतात. यामुळे मूड सुधारण्यास खूप मदत होते.

Stress Free Life protein green vegetables include your diet
Health Care News : चिया सीड्समध्ये दडलाय आरोग्याचा खजिना; या प्रकारे आपल्या आहारात करा समावेश

बदाम

बदाम आपल्या मेंदूसाठी चांगले असतात हे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. जर तुम्ही हे ड्रायफ्रूट्स नियमित खाल्ले तर ते मानसिक आरोग्यासाठी चांगले असेल आणि कोणताही ताणतणाव तुम्हाला येणार नाही.

अंडी

अंडी आरोग्यासाठी उपयुक्त आहे. अंडीमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, अमीनो ॲसिड आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. जे ताण कमी करण्यास मदत करतात. त्यात असलेले कोलीन मेंदूच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. तसेच तणावातून सुटका होते.

Stress Free Life protein green vegetables include your diet
Mental Health: 'मी लग्न करेन तर फक्त विराट कोहलीशी', या वेडेपणाला डॉक्टर काय म्हणतात?

ब्लूबेरी

ब्लूबेरीमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते. याचे सेवन केल्याने ताण कमी होते. तणावात असताना पेशींना निरोगी ठेवण्यासाठी शरीराला व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्सची आवश्यकता असते.

फ्लॉवर

फ्लॉवरसारखी दिसणारी ही भाजी अतिशय आरोग्यदायी मानली जाते, तुम्ही त्याची भाजी किंवा कोशिंबीर खाल्ली असेलच. फ्लॉवरमध्ये फोलेटअसते, जे नैराश्य दूर करण्यास खूप मदत करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com