Stress Management : ताण-तणावाचे करा व्यवस्थापन; मानसिक विकारांपासून होईल रक्षण

एकविसाव्या शतकात ठरु नका मानसिक विकारांचे बळी; अनमोल जीव जाईल मृत्यूच्या दारी
stress management protection from mental disorders health solapur
stress management protection from mental disorders health solapuresakal

- शिवाजी भोसले

सोलापूर : बदलत्या जीवशैलीमध्ये ताण-तणावाला घेऊनच आपण जगतो आहोत. मात्र याचे विपरीत परिणाम आपल्या शारीरिक तसेच मानसिक आरोग्यावर होत आहेत. वाढत्या ताण-तणावावर जाणीवपूर्वक नियंत्रण आणायला हवे. त्यासाठी ‘स्ट्रेस मॅनेजमेंट’ थीम समजून घेऊन तसा बदल स्वतः:मध्ये करुन घेतल्या हे सुंदर आयुष्य सुखाने आणि आनंदाने जगता येईल.

बदलत्या जीवनशैलीमध्ये विविध ताण-तणावांना सामोरे जावे लागत आहे. कामाचे स्वरूप, बदलती कुटुंब रचना, समाजामध्ये वावरण्याचे बदलेले नियम व सोशल मीडिया या सर्वांचा परिणाम होत आहे.

सततच्या ताण-तणावामुळे विविध शारीरिक आणि मानसिक त्रास उद्‌भवत आहे. दरम्यान वेळीच या गोष्टी आपण ओखळल्या आणि योग्य त्या उपायोजन केल्यास त्रास कमी होतो. आवश्यक वाटल्यास मानसिक आरोग्य तज्ज्ञांची भेट घ्यावी. ताण-तणावांचे योग्य व्यवस्थापन करुन आपल्या स्वत:मध्ये योग्य ते दैनंदीन बदल घडविल्यास आपण आपले आयुष्य सुखी आणि आनंदी जगु शकाल.

-डॉ. प्रसन्न खटावकर, मानसिक आरोग्य तज्ज्ञ, आधार हॉस्पीटल, सोलापूर

सहन होईल तेवढाच ताण घ्या

'एक ना धड भाराभार चिंध्या’ या उक्तीप्रमाणे अनेक व्यक्ती एका वेळी अनेक कार्यात स्वत:ला गुंतवून घेतात व त्यामुळे एकही काम व्यवस्थित करू शकत नाहीत व सर्व कामांचा ताण घेऊन दुसऱ्यालाही ताण देतात. त्यामुळे आपल्या क्षमतेनुसार व उक्तीनुसार कार्यक्षेत्राची निवड करून सहन करता येईल तेवढाच ताण घ्यावा म्हणजे निवडलेले काम सुव्यवस्थित पार पडेल.

जीवनमूल्यांशी विपरीत वागू नका

व्यक्ती लहानपणी आपल्या कुटुंबात वडीलधाऱ्या व्यक्तींकडून अनुकरणाने त्यांच्यातील जीवनमूल्ये आत्मसात करते व ती जीवनमूल्ये जीवनाच्या अखेरपर्यंत कसोशीने पाळण्याचा प्रयत्न करते. उदा. प्रामाणिकपणा, नम्रता, सोज्वळपणा, सत्य, अहिंसा इ. त्यामुळे भ्रष्ट, पैसे खाणारा माणूस रात्री सुखाने झोपू शकत नाही.

आत्मविश्वास जागृत ठेवा

आत्मविश्वास हा सर्व यशाचा आत्मा आहे. आत्मविश्वास असेल तरच व्यक्ती सर्व संकंटाना, ताण-तणावांना सहज तोंड देऊ शकेल. उदा. वर्गात विद्यार्थी एखाद्या मुद्यावर वाद घालत असतील अशा वेळी शिक्षकाकडे आत्मविश्वासाची पातळी उच्च असेल तरच तो यशस्वीरीत्या मार्ग काढू शकेल. नाहीतर अपयश पदारी येण्याची शक्यता असते व त्यामुळे ताण - तणाव निर्माण होतो म्हणून व्यक्तीकडे आत्मविश्वासाची पातळी उच्च दर्जाची असावी.

आत्मटीका करू नका

‘मी नालायक आहे, मला जमत नाही, मी करू शकत नाही’ अशी आत्मटीका टाळली पाहिजे. ही वाक्ये माणसाच्या मनात कोणतेही काम करताना वावरत असतील तर त्यांचा आत्मविश्वास खच्ची होऊन त्यांना कोणतेही यश मिळणे अशक्यच. स्वत:ला कमी लेखनाच्या माणसाची स्थिती फार असहाय्य असते. सर्व शक्तींचे मूळच या आत्मटीकेमुळे नष्ट होऊ शकते.

अपयश सहजतेने घ्या

जीवनात यशापयश ऊनसावलीच्या खेळाप्रमाणे चालतच राहणार. मोठमोठ्या लोकांनाही अपयशाचा सामना करावा लागतो. उदा. अब्राहम लिंकन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते पण ते राष्ट्राध्यक्ष होण्याअगोदर १४ वेळा अपयशी झाले होते. तेव्हा अपयशाने ताण वाढवून घेऊ नका. यशासाठी प्रयत्न करा, पण ‘मा फलेषु कदाचन’ या वृत्तीनेच. अपयश आलेच तर स्वत:ला तीन सूचना द्या -

अ) जे झाले त्यापेक्षाही वाईट होऊ शकले असते पण झाले नाही, ब) असेच अपयश वेळोवेळी इतरांना, तसेच आपणासही पूर्वी आले आहेत त्यात वाईट वाटून घेण्यासारखे काहीच नाही, ब) जे झाले तो भूतकाळ; आता हे अपयश धुऊन काढण्यासाठी काय करता येईल याचा विचार करा.

परिपूर्णतेचा अतिरेक टाळा

या उक्तीचा विचार एकविसाव्या शतकात कोणीही करत असलेला दिसत नाही. आयुष्यात लवचिकता आवश्यक आहे. प्रत्येक गोष्ट १०० टक्के जमलीच पाहिजे असे जरुरी नाही. लवचिक वृत्तीचे लोक परिस्थितीशी लवकर जुळवून घेतात आणि अंतिम: सुखी असतात.

नेहमीच प्रोत्साहन देणाऱ्या समूहात राहा

तुमच्या भोवतालचे लोक तुमचा आत्मविश्वास वाढवू शकतात, खच्चीही करू शकतात. एखादा विद्यार्थी परीक्षेला निघाला की, ‘बघ हं, नाहीतर ऐनवेळी उत्तर विसरशील , २-३ पेन वगैरे घे, नाहीतर चालणारच नाहीत !’ वगैरे सांगून त्यास घाबरवून सोडतील. अगोदरच अभ्यासक्रम, पाठ्यक्रम, पाठ्यपुस्तके व परीक्षेतील ताणतणावांनी घाबरलेल्या विद्यार्थ्यांना धीर देणे सोडा, त्यास अधिकच घाबरवले जाते. त्यामुळे अशा लोकांपासून दूर राहा व प्रोत्साहन देणाऱ्या लोकांच्या समूहात रहा.

विपरीत परिस्थितीतही आनंदी राहा

आपण आहोत त्याहीपेक्षा वाईट परिस्थितीत शेकडो लोक आनंदात जगत आहेत. आपल्याच पदरी जगातले सर्व दु:ख, कष्ट आहेत असा काही लोक ग्रह करून घेतात. पण आयुष्यात जे काही होते त्यापेक्षाही वाईट होऊ शकले असते हे लक्षात ठेवा.

विनोदबुद्धी कायम जागृत ठेवा

‘विनोद’ जीवनाकडे, जीवनातल्या विसंगतीकडे कारणरहीत पद्धतीने पाहायला शिकवतो, विनोदाने मनावरचा ताण हलका होतो. विशेषतः: आयुष्यातल्या ताणतणावाच्या प्रसंगाकडे विनोदामुळे एक हसत खेळत पाहण्याची वृत्ती निर्माण होते. त्यामुळे आनंदी राहणे, हसणे - हसविणे या क्रिया गरजेच्या आहेत. सर्व तणावाच्या दु:खांवर रामबाण उपाय म्हणजे हसणे होय आणि हे केवळ विनोदबुद्धीमुळेच घडू शकते.

व्यायाम व इतर पद्धती

ताण - तणाव व्यवस्थापनात व्यायामाला फार महत्त्व आहे. व्यायाम फक्त शारीरिक तंदुरुस्तीसाठीच नाही तर मानसिक आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे असते. योगासनातून ताण कमी करण्याचे सामर्थ्य आहे, हे जगाने मान्य केले आहे. नियमित व्यायाम करणाऱ्या व्यक्तीजवळ तणावाच्या प्रसंगाना तोंड देण्यास उपयुक्त असे शरीरही असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com