
“Strong on the outside, silent within” — highlighting the hidden emotional struggles of men and the need for open mental health conversations.
Sakal
पुरुषाचे सामर्थ्य आणि चिकाटीबद्दल अनेकदा कौतुक केले जात असले तरी पुरुष अनेकवेळा एक अदृश्य ओझे वाहत असतात व ते क्वचितच व्यक्त होतात. भारतात सुमारे ४० टक्के पुरुष त्यांच्या मानसिक आरोग्याबद्दल कधीच उघडपणे बोलत नाहीत आणि महिलांच्या तुलनेत आत्महत्येचे प्रमाण पुरुषांमध्ये जवळजवळ दुप्पट आहे. तज्ज्ञांच्या मते पुरुषांकडून हे भावनिक वेदना व्यक्त करण्याबद्दलचा असलेला मानसिक कलंक खोलवर रुजलेला असल्याचे सांगतात. पुरुषांना “फक्त कमकुवत लोकांना त्रास होतो” याचबरोबर “मानसिक आजार खरे नसतात” किंवा “मानसोपचारतज्ज्ञाकडे जाणे म्हणजे काहीतरी चुकले आहे” अशा चुकीच्या समजुतीमुळे पुरुषांना तज्ज्ञांची मदत घेणे आणखी कठीण जाते.
डॉ. रोहन जहागीरदार, मानसोपचारतज्ज्ञ, आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल, पुणे