
संजय कुलकर्णी
साखरझोप साखरेसारखीच गोड असते. निरोगी आयुष्यासाठी रात्रीची किमान सहा ते सात तासांची शांत झोप महत्त्वपूर्ण मानली जाते. मात्र, सध्याचे जीवन हे धावपळीचे बनले. रात्री झोपेच्या वेळाही पाळल्या जात नाहीत. यात सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे वाढलेला स्क्रीन टाइम. पूर्वी टीव्हीपुरता मर्यादित राहिलेल्या स्क्रीन टाइममध्ये नंतर कॉम्प्युटर व लॅपटॉपने एंट्री केली, त्यानंतर त्यात आला तो स्मार्ट फोन. परिणामी झोपेचे खोबरे झाले.