
थोडक्यात:
झोप लागण्यास अडथळे, झोप वारंवार खंडित होणे किंवा लवकर जाग येणे हे निद्रानाशाचे मुख्य लक्षण आहे.
अल्पकाळ मानसिक तणावामुळे होणारा निद्रानाश नैसर्गिक असला तरी दीर्घकाळ राहिल्यास थकवा आणि अस्वास्थ्य वाढते.
झोपेची तूट दीर्घकाळ भरून न निघाल्यास मानसिक, भावनिक आणि शारीरिक समस्या उद्भवतात.
These Reasons Are Responsible For Insomnia: झोप लागण्यास वेळ लागणे, झोप खंडित होत राहणे, जाग लवकर येणे आणि झोपेतून जाग येताना ताजेतवाने न होणे या सगळ्या व्यथा निद्रानाशात मोडतात. कोणत्याही मानसिक तणावातून जाताना असे अकस्मात अल्पकाळ होणे निसर्गक्रमप्राप्त आहे; पण जेव्हा निद्रानाशाचा त्रास दीर्घकाळ टिकतो, तेव्हा थकवा जाणवू लागतो. झोपायची वेळ आली, की आता मला आज (परत) झोप लागणार नाही या विचाराने मन चिंतातूर बनू लागते. झोपेची तूट भरून न निघाल्यास मानसिक अस्वास्थ्य, चिंतातूर स्थिती, संशयी वृत्ती, खिन्नता, विस्मृती, आत्मविश्वास गमावणे, धडधडणे, तोंड कोरडे राहणे, हातापायाला कंप सुटणे, भूक न लागणे इत्यादी त्रास होऊ लागतात.