
Successful Bone Marrow Transplant Gives New Life to Thalassemia-Affected Child in Nagpur
sakal
Thalassemia Awareness: न्यू इरा मदर अँड चाइल्ड हॉस्पिटलमध्ये मध्य भारतात पहिल्यांदाच थॅलेसेमिया मेजर असलेल्या बालकासाठी यशस्वी बाल चिकित्सा अस्थिमज्जा प्रत्यारोपण (बोन मॅरो ट्रॉन्सप्लान्ट) करण्यात आले आहे. आठ वर्षांच्या चिमुकलीवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्यामुळे ज्यामुळे तिला आता सामान्य जीवन जगता येईल. उपराजधानीत हजारो थॅलेसेमियाबाधित असून, आता या कुटुंबातील बाधित मुलांसाठी बोन मॅरो वरदान ठरणार आहे. न्यू इरा रुग्णालयात डॉ. आतिश बकाने, डॉ. प्रियंका पवार आणि डॉ. आनंद भुतडा यांनी ही शस्त्रक्रिया यशस्वी केली.