Health Care News: सतत गोड खाल्ल्याने मेंदूवर होतो परिणाम? या आहेत वाईट सवयी...

जास्त गोड खाल्ल्याने तुमच्या आरोग्याला मोठे नुकसान होऊ शकते.
Health
Health sakal

सण-उत्सवांचा काळ सुरु झाला आहे. अशा वेळी घरात गोड पदार्थ जास्त तयार केले जातात. जर गोड खायला आवडत असेल तर काही लोक मनसोक्त गोड पदार्थ खातात. यावेळी प्रमाणाबाहेर गोड पदार्थ खाल्ली जातात. मात्र जास्त गोड खाणे तुमच्या आरोग्यासाठी  हानिकारक ठरु शकते.

आपला मेंदू  म्हणजे आपल्या शरीरातील अत्यंत संवेदनशील आणि महत्वाचा भाग. आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवण्याचे काम आपला मेंदू करत असतो. त्यामुळे आपल्या शरीरातील इतर अवयांसोबतच आपल्या मेंदूची काळजी घेणेही महत्वाचे आहे. मात्र आपल्या काही वाईट सवयींमुळे आपल्याला मेंदूचे विकार होतात. या वाईट सवयी कोणत्या आहेत हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Health
Homemade Herbal Shampoo : घरच्या घरी तयार करा हर्बल शॅम्पू, केस होतील काळेभोर-घनदाट

धूम्रपान 

धूम्रपान करणे तुमच्या शरीरासोबतच मेंदूसाठीही  धोकादायक आहे. यामुळे मेंदू कमजोर होतो.. एका विद्यापीठात झालेल्या अभ्यासानुसार धूम्रपानामुळे कॉर्टेक्सवर परिणाम होतो. ज्यामुळे स्मरणशक्ती आणि भाषा कौशल्य धोक्यात येते. 

पाण्याची कमतरता  

निरोगी राहण्यासाठी भरपूर पाणी प्यावे असे  सांगण्यात येते. पाणी पिणार्‍या लोकांचा मेंदू पाणी न पिणार्‍यांपेक्षा तब्बल 14 टक्क्यांहून अधिक चांगले काम करतो. 

ताण

ताण आल्यामुळे आपल्या मेंदूवरही वाईट परिणाम होतात. ज्यामुळे आपला मेंदू नीट काम करू शकत नाही. त्यामुळे तणाव येणे टाळले पाहिजे. ताणात असल्यास मूत्रपिंड कॉर्टिसॉलची निर्मिती करते. मात्र कॉर्टिसॉलची जास्त प्रमाणातील निर्मिती ही मेंदूच्या पेशींवर वाईट परिणाम करते.

इअरफोन

मोबाइलवर इअरफोन लावून गाणी ऐकण्याची सवय  प्रत्येकाला आहे. मात्र याचा वाईट परिणाम आपल्या मेंदूवर होऊ शकतो. गाणी हळू आवाजात ऐकायला हवीत. जास्त आवाजात ऐकल्यास कान खराब होतात आणि मेंदूच्या पेशींचे अत्यंत नुकसान होते. 

Health
Health Care News : महिलांना पुरुषांपेक्षा कमी असतो हार्ट अ‍ॅटॅकचा धोका; जाणून घ्या

झोप 

प्रत्येकाने रोज रात्री कमीत कमीत 7 ते 8 तास झोप घेणे आवश्यक असते. त्यामुळे मेंदू योग्य प्रकारे काम करण्यास मदत होते. मात्र व्यक्तीला पुरेशी झोप मिळाली नाही तर चिडचिड होते राग येतो परिणामी मेंदूचे कार्य बिघडते. 

गोडाचे अतिप्रमाण 

आपल्या जेवणात नेहमी गोड पदार्थ हवाच अशी मागणी अनेक जणांची असते. मात्र आजच जास्त गोड पदार्थ खाणे कमी करा. करण यामुळे तुमच्या मेंदूची विचार करण्याची क्षमता कमी होऊ शकते. रूमची स्मरणशक्तीही कमी होऊ शकते.   

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com