Summer Drink : उन्हाळ्यातील या पेयांमुळे मन होईल शांत, अॅलर्जी आणि अॅसिडिटीपासून मिळेल मुक्ती

उन्हाळ्यात सकाळ- दुपार- संध्याकाळ अगदी केव्हाही थंड काही तरी प्यायला दिलं तर बरंच वाटतं
Summer Drink
Summer Drinkesakal

Summer Drink : उन्हाळ्यात सकाळ- दुपार- संध्याकाळ अगदी केव्हाही थंड काही तरी प्यायला दिलं तर बरंच वाटतं. अशावेळी तर घरात लहान मुलं आणि वयस्कर व्यक्ती असतील तर त्यांनाही या काळात जेवण कमीच जातं आणि थंडगार काहीतरी पिण्याची इच्छा होते. तसंही उन्हाळ्यात डिहायड्रेशन रोखण्यासाठी लिक्विड पदार्थ अधिक प्रमाणात घेणं गरजेचं असतंच.

Summer Drink
World's Most Expensive Water Bottle : जगातील सर्वात महाग पाण्याची बाटली, या किमतीत खरेदी करता येईल लक्झरी फ्लॅट

शिवाय उन्हाळ्यात घरी आलेल्या पाहुण्यांनाही गरम चहा पिणं नको वाटतं. त्यामुळे त्यांना देण्यासाठीही घरात एखादं सरबत असलेलं कधीही उत्तम. म्हणूनच तर पाहुण्यांसाठी, घरातल्या लहान- मोठ्या व्यक्तींसाठी आणि स्वत:साठीही करा घरच्याघरी रूह अफजा... या पेयाची चव तर अशी लाजवाब आहे, की हा रूह अफजा तुम्ही घरी केला आहे, हे सांगूनही कुणाला खरं वाटणार नाही. झटपट होणाऱ्या या चवदार सरबताची ही घ्या अगदी सोपी रेसिपी.

Summer Drink
Health Tips : रात्रीचं जेवन टाळणं हानिकारक असते?

रुह अफजा लिंबूपाणी

रुह अफजा लिंबूपाणी हे उन्हाळ्यातील सर्वात उत्तम पेय आहे. हे पेय बनवण्यासाठी, तुमच्या नेहमीच्या लिंबूपाणी पेयात थोडेसे रुह अफजा घाला. त्यामुळे लिंबूपाण्याची रोजची चवही येईल. आंबट-गोड रुह अफजा लिंबूपाणी प्यायल्यानेही तुम्हाला ताजेतवाने वाटेल. उन्हाळ्याच्या दिवसात तुमची तहान भागवण्यासाठी योग्य.

Summer Drink
Dressing Tips : उंची कमी आहे? फॉलो करा हा फॅशन ट्रेंड! दिसाल उंच

रूह अफजा मिल्क शेक

रुह अफजा उन्हाळ्यात तुमची प्रकृती थंड ठेवतो. विशेषत: ज्या लोकांच्या नाकातून रक्त येणे, ऍलर्जी किंवा पोटात ऍसिडिटीची समस्या आहे - त्यांनी रुह अफजा मिल्क शेक प्यावे. ते बनवण्यासाठी तुम्हाला 3 चमचे रूह अफजा, 2 चमचे सब्जाच्या बिया, 1 लिटर दूध, 2 चमचे साबू दाना आणि 1 पॅकेट लाल जेली लागेल.

Summer Drink
Travel Story : मे महिन्यात फिरायला जायचंय ? ही ठिकाणं आहेत उत्तम

रुह अफझा इज टी

रूह अफजा आइस टी क्लासिक रेसिपीमध्ये गणली जाते. आइस टी बनवल्यानंतर थोडेसे रुह अफजा टाकून हे पेय बनवता येते. उन्हाळ्यात रुह अफजा आइस टी पिणे हा एक चांगला पर्याय असू शकतो.

Summer Drink
Mental Health संबंधित समस्या असल्यास महिलांना जाणवतात ही लक्षणं, दूर्लक्ष कराल तर...

रुह अफझा मोईतो

रुह अफजा मोइतो बनवण्यासाठी काही पुदिन्याची पाने साखर आणि लिंबाचा रस मिसळा. यानंतर थोडा रुह अफजा घाला. हवं असल्यास, आपण सोडा पाणी देखील घालू शकता. हे पेय तुम्ही उन्हाळ्याच्या दुपारी वापरून पाहू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com